शिंदे गट-मनसे युती नाही! राज ठाकरेंचा ‘एकला चलो रे’चा नारा; संदीप देशपांडे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: आगामी काळातील निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे गट आणि मनसेची युती होणार अशी चर्चा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपती दर्शनानिमीत्त भेटी झाल्या होत्या. तेव्हापासून मनसे- शिंदे गटाच्या युतीची चर्चा होती. आता त्या चर्चांना ब्रेक लागला आहे. मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले मनसे प्रवक्ते संदिप देशपांडे?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी सुरु केली आहे. आगामी काळातल्या सर्व महानगरपालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. “आम्ही मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. आम्ही स्वतंत्र्य आहोत, सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झाला आहे,” असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर काय म्हणाले संदिप देशपांडे?

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात गेल्यानंतर विरोधी पक्ष राज्य सरकारवरती टीका करत आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही प्रतिक्रिया देऊन राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. आता मनसे प्रवक्ते संदिप देशपांडे म्हणाले “वेदांतासारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे, या प्रकल्पामुळे राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका.”

हे वाचलं का?

सांगलीतील ऋषींना झालेल्या मारहाणीवर संदिप देशपांडे म्हणाले…

उत्तर प्रदेशातील मथुरा येथील चार साधूंच्या टोळीला मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात ही घटना घडली आहे. हे चार साधू कर्नाटकातून जतमार्गे पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जात होते. त्या घटनेवर संदिप देशपांडे म्हणाले “सांगली साधू मारहाणीबाबत सरकारने योग्य कारवाई करावी, सरकार आता बदललं आहे.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT