महामानवाला यथार्थ आदरांजली, 2 हजार 51 वह्यांनी साकारलं सिम्बॉल ऑफ नॉलेज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती भारतासह जगभरात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय समाजव्यवस्थेतील दलित समुदायाला शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष असा मूलमंत्र दिला. कल्याण शहरात बाबासाहेबांच्या विचारांना यथार्थ आदरांजली वाहणारं सिम्बॉल ऑफ नॉलेज तयार करण्यात आलंय. 2 हजार 51 वह्यांचा वापर करुन बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. कल्याण […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती भारतासह जगभरात साजरी केली जात आहे.
हे वाचलं का?
बाबासाहेबांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय समाजव्यवस्थेतील दलित समुदायाला शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष असा मूलमंत्र दिला. कल्याण शहरात बाबासाहेबांच्या विचारांना यथार्थ आदरांजली वाहणारं सिम्बॉल ऑफ नॉलेज तयार करण्यात आलंय.
ADVERTISEMENT
2 हजार 51 वह्यांचा वापर करुन बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती आणि बासरीवाला आधुनिक ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
आजच्या दिवशी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे कल्याणमधील मंडळाने ही प्रतिकृती तयार करत त्यांना मानवंदना दिली आहे.
कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग कार्यालयाच्या शेजारी 660 चौरस फूटाच्या जागेवर 2 हजार 51 वह्यांचा वापर करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे
या प्रतिकृतीची सध्या कल्याण शहरात चांगलीच चर्चा होते आहे.
हे शिल्प बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थाने मानवंदना देणारं ठरलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमीत्त मुंबई तक चा मानाचा मुजरा !
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT