चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात 18 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाची दुसरी लाट ही संपूर्ण देशासाठी घातक ठरली आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे झपाट्याने होत असलेला कोरोना संसर्ग. या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात 18 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. खरंतर राज्यात कोरोना मृत्यूचं प्रमाण हे पहिल्या लाटेच्या तुलनेत कमी आहे. तरीही दुसऱ्या लाटेत 18 हजार 959 मृत्यूंची नोंद झाली आहे. जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या कालावधीत हे मृत्यू झाले आहेत.

ADVERTISEMENT

दुसरीकडे कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजेच मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत महाराष्ट्रात 50 हजार 637 मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्राचा मृत्यूदर हा सरासरी 2.7 टक्के होता तर दुसऱ्या लाटेत हा मृत्यूदर सरासरी 0.71 टक्के इतका आहे. तरीही अवघ्या चार महिन्यात 18 हजारांहून अधिक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात Corona मृत्यूदर घटला आहे… पण मृत्यू नाही.. हे आहे कारण

हे वाचलं का?

डॉ. प्रदीप आवटे यांनी कोरोना मृत्यूंबाबत काय म्हटलं आहे?

दुसऱ्या लाटेत कोरोना रूग्णांचे मृत्यू झपाट्याने वाढले आहेत. एवढंच नाही तर कोरोना रूग्णांची संख्याही झपाट्याने वाढल्याचं दिसून येतं आहे. हा ट्रेंड सगळ्याच वयोगटांमध्ये पाहण्यास मिळतो आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जास्त पॉझिटिव्ह केसेस समोर येत आहेत. 31 ते 40 या वयोगटातल्या लोकांना कोरोना संसर्गाचं प्रमाण हे दुसऱ्या लाटेत जास्त आहे. 2020 मध्ये 4.1 लाख केसेस या वयोगटातल्या होत्या. तर दुसऱ्या लाटेत अवघ्या चार महिन्यात या वयोगटातल्या 6 लाखांपेक्षा जास्त केसेस आहेत.

ADVERTISEMENT

कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस वेळेत न मिळाल्यास काय करावे?

ADVERTISEMENT

पहिल्या लाटेमध्ये 81 ते 90 वर्षे वयोगटातला मृत्यू दर हा 11.67 टक्के इतका जास्त होता. तो दुसऱ्या लाटेत या वयोगटासाठी 3.58 टक्के इतका कमी झाला हे. 61 ते 70 या वयोगटात चार महिन्यांमध्ये म्हणजेच दुसऱ्या लाटेत 5 हजार 491 मृत्यूंची नोंद झाली आहे. 2020 मध्ये 61 ते 70 या वयोगटातले 15000 हजार मृत्यू नोंदवले गेले होते.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग होऊ लागला आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाने उच्चांक गाठला होता. त्यानंतर कोरोना रूग्णसंख्या कमी होऊ लागली. दुसऱ्या लाटेला फेब्रुवारी महिन्यात सुरूवात झाली आणि आता या लाटेने उच्चांक गाठला आहे असं म्हटलं जातं आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT