महाराष्ट्रात दिवसभरात 21 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 154 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 21 हजार 81 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 55 लाख 64 हजार 348 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.25 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 10 हजार 219 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात 154 मृत्यूंची नोंद झाली […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 21 हजार 81 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 55 लाख 64 हजार 348 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.25 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 10 हजार 219 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात 154 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.72 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 66 लाख 96 हजार 139 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 42 हजार नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12 लाख 47 हजार 33 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 6 हजार 232 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 74 हजार 320 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
समजून घ्या : कोरोना लस घेतलेली व्यक्तीमुळेही तुम्हाला कोरोना होऊ शकतं का?
हे वाचलं का?
आज राज्यात 10,219 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 58 लाख ४२ हजार इतकी झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण १५४ मृत्यूंपैकी ९६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 186 ने वाढली आहे. हे 186 मृत्यू, यवतमाळ-49, पुणे-35, कोल्हापूर-25, नाशिक-15, ठाणे-14, अहमदनगर-11, अकोला-8, औरंगाबाद-7, उस्मानाबाद-5, सिंधुदुर्ग-5, चंद्रपूर-3, लातूर-2, रायगड-2, जालना-1, नागपूर-1, सांगली-1, सोलापूर-1 आणि पालघर-1 असे आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT