नागपुरात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक, आज ३ हजार १७७ नवे रुग्ण
महाराष्ट्राची उप-राजधानी असलेल्या नागपूर शहरातली कोरोनाची परिस्थिती अजुनही चिंताजनकच आहे. आज शहरात ३ हजार १७७ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले असून ५५ नागरिकांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या ३ दिवसांपासून नागपूर शहरात मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे या परिस्थीतीवर नियंत्रण कसं मिळवायचं याबाबत प्रशासनामध्ये गंभीर चर्चा सुरु आहे. कालच गृहमंत्री अनिल देशमुख […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राची उप-राजधानी असलेल्या नागपूर शहरातली कोरोनाची परिस्थिती अजुनही चिंताजनकच आहे. आज शहरात ३ हजार १७७ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले असून ५५ नागरिकांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या ३ दिवसांपासून नागपूर शहरात मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे या परिस्थीतीवर नियंत्रण कसं मिळवायचं याबाबत प्रशासनामध्ये गंभीर चर्चा सुरु आहे. कालच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विभागीय आयुक्तात बैठक घेऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.
ADVERTISEMENT
दरम्यान सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आपली वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने सुरु असल्याचं सांगत आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल अशी भीती व्यक्त केली होती.
आत्ताचा लॉकडाउन ‘तसाच’ असेल का?
हे वाचलं का?
“सध्याच्या घडीला राज्यात दर दिवशी १० टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ होते आहे. ही वाढ खरंच चिंताजनक आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही वाढ अशीच राहिली तर आपल्याला रुग्णालयात बेड कमी पडतील की काय अशी शंका निर्माण झाली आहे. याचसोबत जर कोरोनाचा स्ट्रेन बदलला आणि नवीन म्युटेशनचे रुग्ण सापडले तर आरोग्य यंत्रणेवर नक्कीच ताण पडू शकतो. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये आढावा घेऊन निर्बंध अधिक कडक करण्याबाबत विचार सुरु आहे. आपली वाटचाल ही लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. लोकांना आता गांभीर्याने वागावंच लागेल. मास्क घातले नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही तर लॉकडाऊन लावावंच लागेल.” राजेश टोपे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचंही सांगितलं. आजही अनेक लोकं आपल्यात सौम्य लक्षणं आढळली तरीही डॉक्टरांकडे जात नाहीत, घरीच थांबतात. काही वेळाने परिस्थिती गंभीर होते आणि मग ते डॉक्टरकडे जातात. त्यामुळे आपल्यात सौम्य लक्षणं दिसून आली तरी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या असं आवाहन राजेश टोपेंनी यावेळी बोलत असताना केलं.
ADVERTISEMENT
लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर तरीही मुंबईकरांना कोरोनाची भीती वाटत नाही?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT