महाराष्ट्रात आज ६३ हजाराच्या वर कोरोनाचे नवे रुग्ण, मृत्यू दर कमी न झाल्यामुळे चिंता कायम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासमोरचं रुग्णवाढीचं संकट अजुनही कमी होताना दिसत नाहीये. आज महाराष्ट्रात ६३ हजार २८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आजच्या दिवसात राज्यभरात ६१ हजार ३२६ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले असून राज्याचा रिकव्हरी रेट ८४.२४ टक्के इतका आहे. परंतू आज ८०२ जणांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरची चिंता कायम […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासमोरचं रुग्णवाढीचं संकट अजुनही कमी होताना दिसत नाहीये. आज महाराष्ट्रात ६३ हजार २८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आजच्या दिवसात राज्यभरात ६१ हजार ३२६ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले असून राज्याचा रिकव्हरी रेट ८४.२४ टक्के इतका आहे. परंतू आज ८०२ जणांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोरची चिंता कायम आहे.
ADVERTISEMENT
District wise #Corona active cases in Maharashtra. As on May 1, 2021.#MaharashtraFightsCorona#WarAgainstVirus#IAmResponsible#BreakTheChain pic.twitter.com/OZ1cSrFrOF
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) May 1, 2021
दरम्यान राज्यातील रुग्णसंख्या वाढीचा दर कमी होताना दिसत नसला तरी गेल्या काही दिवसांत मुंबईत वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. आज मुंबईत ३ हजार ९०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ९० जणांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत.
#CoronavirusUpdates
१ मे, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/4RLUbEU8Pf— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 1, 2021
दरम्यान राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून कसोशीने प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना आरोग्य व्यवस्थेत करण्यात आलेल्या वाढीबद्दल माहिती दिली.
हे वाचलं का?
वर्षभरात राज्यातील आरोग्य व्यवस्थेत उल्लेखनीय वाढ, जाणून घ्या राज्याचं Health Card –
RTPCR चाचण्यांसाठी प्रयोगशाळा –
ADVERTISEMENT
मार्च २०२० – २ प्रयोगशाळा
ADVERTISEMENT
२९ एप्रिल २०२१ – ६०९ प्रयोगशाळा
कोविड सेंटर्सची संख्या –
जुन २०२० – २ हजार ६६५
२९ एप्रिल २०२१ – ५ हजार ५९५
बेड्स –
जुन २०२० – ३ लाख ३६ हजार ३८४
२९ एप्रिल २०२१ – ४ लाख ३१ हजार ९०२
ऑक्सिजन बेड्स –
जुन २०२० – ४२ हजार ८१३
२९ एप्रिल २०२१ – ८६ हजार १०८
आय.सी.यू बेड्स –
जुन २०२० – ११ हजार ८८२
२९ एप्रिल २०२१ – २८ हजार ९३७
व्हेंटिलेटर्स –
जुन २०२० – ३ हजार ७४४
२९ एप्रिल २०२१ – ११ हजार ७१३
याव्यतिरीक्ता राज्यात ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता वाढवला येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उद्घव ठाकरेंनी सांगितलं. सध्या राज्याची ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता ही १ हजार २७० टन असून वापर हा १ हजार ६१५ मेट्रीक टन एवढा होतो आहे. ऑक्सिजनच्याी वाहतुकीत येणारे अडथळे लक्षात घेऊन यापुढे राज्य सरकार ज्या ठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती होते आहे त्याच भागात कोविड सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करत असून काही भागांमध्ये याची सुरुवात झाल्याचंही ठाकरेंनी सांगितलं. ब्रेक द चेन नियमाअंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे रुग्णसंख्या स्थिरावल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं, त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर कधीपर्यंत नियंत्रण मिळवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT