महाराष्ट्रात दिवसभरात 63 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्ण, सर्वाधिक 985 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 63 हजार 309 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 61 हजार 181 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 37 लाख 30 हजार 729 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 83.4 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात महाराष्ट्रात 985 कोरोना मृत्यूंची नोंद […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 63 हजार 309 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 61 हजार 181 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 37 लाख 30 हजार 729 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 83.4 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात महाराष्ट्रात 985 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 65 लाख 27 हजार 862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44 लाख 73 हजार 394 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या 42 लाख 3 हजार 547 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 31 हजार 159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
संतापजनक घटना… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 22 कोरोना रुग्णांचे मृतदेह
हे वाचलं का?
राज्यात आज घडीला 6 लाख 73 हजार 481 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. दिवसभरात राज्यात 63 हजार 309 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 44 लाख 73 हजार 394 इतकी झाली आहे.
दिवसभरात 985 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी 392 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 251 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 342 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू पुणे 82, औरंगाबाद 80, ठाणे 53, नंदुरबार 37, नागपूर 23, नाशिक 17, वाशिम 9, हिंगोली 7, जळगाव 4, धुळे 3, रायगड 3, अहमदनगर 2, जालना 2, सांगली 2 आणि सोलापूर 1 असे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
देशात कोरोना रुग्ण वाढताच लॉकडाऊनबाबत पाहा केंद्र सरकारने काय दिला आदेश
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई-67 हजार 984
ठाणे – 74 हजार 123
पालघर-16 हजार 710
रायगड- 13 हजार 177
पुणे- 1 लाख 397
सातारा-16 हजार 761
सांगली- 12 हजार 413
सोलापूर- 15 हजार 550
नाशिक-52 हजार 610
अहमदनगर-22 हजार 77
औरंगाबाद-14 हजार 534
बीड- 11 हजार 923
लातूर- 11 हजार 408
यवतमाळ-12 हजार 113
नागपूर-75 हजार 345
भंडारा- 13 हजार 642
चंद्रपूर- 26 हजार 193
अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पाहिली तर सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण पुण्यात आहेत. त्यापाठोपाठ नागपूर, ठाणे आणि मुंबईत आहेत. कोरना नियंत्रणात येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र गेल्या 14 दिवसात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन किमान 15 दिवसांनी तरी वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT