सोमय्या पितापुत्राच्या अडचणी वाढणार?; आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात पोलिसांचं समन्स

मुंबई तक

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या आणखी आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलन प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून, आता मुंबई पोलिसांकडून सोमय्या पितापुत्राची चौकशी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावलं आहे. नौदलाची मोडीत निघालेली आयएनएस विक्रांत ही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या आणखी आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलन प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून, आता मुंबई पोलिसांकडून सोमय्या पितापुत्राची चौकशी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावलं आहे.

नौदलाची मोडीत निघालेली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी पैसे गोळा केले होते आणि हे पैसे राजभवनाकडे न देता निवडणुकीच्या प्रचारात आणि मुलाच्या कंपनीत वापरल्याचा आरोप राऊतांनी केलेला आहे. या आरोपानंतर किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सैनिक बबन भोसले यांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्याविरूद्ध गुरुवारी (७ एप्रिल) गुन्हा दाखल केला. या प्रकरणात ट्रॉम्बे पोलिसांकडून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांची चौकशी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून तसं समन्स बजावण्यात आलं आहे. उद्या (९ एप्रिल) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?