मुंबईत दिवसभरात 2662 रूग्ण पॉझिटिव्ह, तर 5 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज
मुंबईत आज दिवसभरात 2662 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 5746 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 78 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 89 टक्के झाला आहे. तर 26 एप्रिल ते 2 मे या कालावधीतला पॉझिटिव्हिटी रेट 0.61 टक्के इतका कमी झाला आहे. मुंबईतील रूग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना […]
ADVERTISEMENT
मुंबईत आज दिवसभरात 2662 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 5746 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 78 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 89 टक्के झाला आहे. तर 26 एप्रिल ते 2 मे या कालावधीतला पॉझिटिव्हिटी रेट 0.61 टक्के इतका कमी झाला आहे. मुंबईतील रूग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसते आहे. मात्र महाराष्ट्रात तशी स्थिती नाही.
ADVERTISEMENT
Mumbai reports 2,662 new positive cases, 5,746 discharges, and 78 deaths today.
Active cases: 54,143
Death toll: 13,408 pic.twitter.com/EhbL9d4WO6— ANI (@ANI) May 3, 2021
RCB vs KKR IPL 2021: ‘हे’ दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, आजची मॅच रद्द
मुंबईचा डबलिंग रेट हा 111 दिवसांवर गेला आहे. आज दिवसभरात ज्या 78 मृत्यूंची नोंद झाली त्यातले 50 रूग्ण हे सहव्याधी असलेले होते. तर 52 रूग्ण हे पुरुष आहेत तर 26 रूग्ण या महिला होत्या. पाच रूग्ण हे 40 वर्षांखालील होते. तर 20 मृत्यू हे 40 ते 60 या वयोगटातले होते. उर्वरित 53 मृत्यू हे 60 वर्षे आणि त्यावरील वयाचे होते.
हे वाचलं का?
आजपर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 58 हजार 866 कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर एकूण 5 लाख 89 हजार 619 रूग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत. आज घडीला मुंबईत 54 हजार 143 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत मुंबईत 13 हजार 408 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 23 हजार 542 चाचण्या झाल्या होत्या. मुंबईत रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 89 टक्के झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT