प्रेयसीने लग्नाला दिला नकार, प्रियकराने केली हत्या; रक्ताने माखलेला चाकू घेऊन…..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तरूणीने लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने चाकूने गळा चिरत आणि तिच्यावर अनेक वार करत तिची हत्या केली. या मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या तरूणीने लग्नाला नकार दिल्याने त्या तरूणाने तिची हत्या केली असा आरोप तरूणीच्या घरातल्यांनी केला आहे. हत्या केल्यानंतर हा तरूण पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने रक्ताने माखलेला चाकू त्याने पोलिसांना दिला.

ADVERTISEMENT

विवाहबाह्य संबंधांमुळे महिला आणि पुरुषाने गमावला जीव.. कशी करण्यात आली हत्या?

उत्तर प्रदेशात बागपतमधे माथेफिरू तरूणाने तरूणीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने लगेचच पोलीस ठाण्यात जात चाकू पोलिसांना दिला आणि तरूणीची हत्या केल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या माथेफिरू तरूणाला अटक केली आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बागपत पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक नीरज कुमार यांनी सांगितलं की ही तरूणी गेल्या काही वर्षांपासून तरूणाच्या प्रेमात होती. दोघांमध्ये काही कारणामुळे वाद झाला. त्यानंतर या तरूणाने तिची हत्या केली.

हे वाचलं का?

मुलानेच केला बापाचा खून, कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्याला संपवलं

हत्या झालेल्या तरूणीच्या पालकांनी असं म्हटलं आहे की ज्या तरूणाने हत्या केली त्याचे कुटुंबीय काही दिवसांपूर्वी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आमच्याकडे आले होते. आम्ही मात्र त्यांना नकार दिला. त्यानंतर आमच्या मुलीने म्हणजेच रिंकूनेही त्याला लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर त्याने आमच्या मुलीला ठार केलं.

ADVERTISEMENT

या मुलीचं नाव दीपा असं होतं तिला रिंकू अशी हाक घरातले मारत होते. तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केली. त्यानंतर चाकू त्याने पोलीस ठाण्यात नेऊन दिला आणि सरेंडर केलं. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. दीपाला या तरूणाने ठार मारण्याची धमकी दिली होती असाही आरोप तिच्या घरातल्यांनी केला आहे. दीपाचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

दीपा आणि त्याच्यात लग्नावरूनच वाद झाला असावा आणि त्यामुळेच त्यांनी दीपाची हत्या केली असावी असंही तिच्या घरातल्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. आता पोलीस या प्रकरणी तरुणाची चौकशी करत आहेत. त्याने हे टोकाचं पाऊल नेमकं का उचललं हे पोलीस जाणून घेत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT