नागपुरात 12 वर्षाच्या मुलाची हत्या; बहिणीनेच भावाला संपवल्याचा संशय
नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या द्रुगधामना परिसरात एका १२ वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुजल नाशिकराव रामटेक असं हत्या झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. सुजलची हत्या ही त्याच्या मोठ्या बहिणीनेचं केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. अनैतिक संबंध लपवण्यासाठी सुजलच्या बहिणीने त्याची हत्या केली असावी, असा संशय […]
ADVERTISEMENT
नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या द्रुगधामना परिसरात एका १२ वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुजल नाशिकराव रामटेक असं हत्या झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. सुजलची हत्या ही त्याच्या मोठ्या बहिणीनेचं केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
अनैतिक संबंध लपवण्यासाठी सुजलच्या बहिणीने त्याची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुजलच्या बहिणीसह तिच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे.
नाशिकराव रामटेक यांना दोन अपत्य आहेत. त्यापैकी मोठी मुलगी ही १७ वर्षांची आहे, तर सुजल हा १२ वर्षांचा होता. तो द्रुगधामना येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावीत शिकत होता. काल (18 ऑक्टोबर) सुजल खेळून घरी आल्यानंतर अचानक निपचित पडला, त्यानंतर सुजलच्या बहिणीने आरडाओरडा करून शेजारच्यांना बोलावलं. मात्र तोपर्यंत सुजलचा मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी सुजलचे आई वडील काम निमित्ताने घरा बाहेर गेलेले होते.
हे वाचलं का?
नागपूर : भाडेकरुच्या जाचाला कंटाळून घरमालकाची आत्महत्या
अनैतिक संबंधातून हत्या?
ADVERTISEMENT
सुजलच्या बहिणीने शेजारच्या लोकांना सांगितलं की, सुजल खेळून घरी परतल्यानंतर अचानक निपचित पडला. पण प्रत्यक्षात गळ्यावर फास लागल्याच्या खुना दिसत होत्या. प्रकरण संशयास्पद वाटतं असल्याने स्थानिकांनी लगेच या घटनेची माहिती वाडी पोलिसांना दिली.
ADVERTISEMENT
नागपूर हादरलं! मित्रानेच केला घात; 17 वर्षीय मुलीवर सात जणांनी केला बलात्कार
पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली; तेव्हा प्रकरणात काळंबेरं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर चौकशी सुरू केली. अनैतिक संबंध लावण्यासाठी सुजलच्या मोठ्या बहिणीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली असावी, या असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. पोलिसांनी सुजलची मोठी बहीण आणि मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT