नागपूर : सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरुणीकडून धक्कादायक खुलासा; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

सोमवारी (12 डिसेंबर) सायंकाळी नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली. अपहरण करून आपल्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची तक्रार एका तरुणीने नागपूर पोलिसांत दिली. त्यानंतर नागपूरच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपींचा शोधही सुरू केला. अखेर 6 तासांनंतर तरुणीने खोटी तक्रार दाखल केल्याचं समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे तक्रार दाखल करण्याचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले.

नागपूर शहरातील एका तरुणीने आपल्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. पोलिसांनी कळमना ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. शहरातील 100 सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांनी तपासलं. त्याचबरोबर आरोपींच्या शोधासाठी तब्बल 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावर लावलं. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. नंतर तरुणीने खोटी तक्रार केल्याचं उघड झालं.

हे वाचलं का?

या संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती देताना नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “तरुणी सोमवारी सकाळी 9 वाजता नागपूर शहरातील बर्डीतील मुख्य रस्त्यावर बसमधून उतरली. काही याच परिसरात फिरल्यानंतर ती चिखली भागात गेली आणि आपल्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खोटी तक्रार दिली.”

“तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं होतं. मेडिकल रिपोर्टमध्ये आणि तपासात मिळालेल्या माहितीतून तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे समोर आलं. तरुणीने कौटुंबिक कारणामुळे सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगून पोलिसांची आणि कुटुंबियांचीही दिशाभूल केली”, असं आयुक्त म्हणाले.

ADVERTISEMENT

तरुणीने रामदास पेठ भागातून अपहरण झाल्याचं सांगितल्यानं पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती. मात्र, तरुणीने सांगितलेली घटना खोटी असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला याबद्दल विचारणा केली. त्यावर तरुणीने दिलेलं उत्तर ऐकून पोलिसांनी कपाळावर हात मारुन घेतला.

ADVERTISEMENT

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या तरुणीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. तिला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. मात्र, तिच्या कुटुंबियांचा याला विरोध आहे. त्यामुळे तिने विचार केला की, बलात्काराची तक्रार दिली, तर घरचे प्रियकरासोबत लग्न लावून देण्यासाठी तयार होतील. त्यानंतर तिने खोटी गोष्ट सांगून खोटी तक्रार पोलिसांत दाखल केली होती. या प्रकरणाचा आता पोलीस तपास करत असून, खोटी तक्रार दिल्याप्रकरणी पोलीस तरुणीवर गुन्हा दाखल करणार असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT