नागपूर : अल्पवयीन प्रेमी जोडप्याची धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी नागपूरमधील कामठी भागात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात एका अल्पवयीन जोडप्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. हावडा स्थानकातून अहमदाबादला जाणारी गाडी कामठी स्थानक परिसरात आली असता या जोडप्याने उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं आहे. यापैकी मुलीच्या […]
ADVERTISEMENT
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
नागपूरमधील कामठी भागात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात एका अल्पवयीन जोडप्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
हावडा स्थानकातून अहमदाबादला जाणारी गाडी कामठी स्थानक परिसरात आली असता या जोडप्याने उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं आहे. यापैकी मुलीच्या पालकांनी दोन दिवसांपूर्वी ती गायब झाल्याबद्दल तक्रार नोंदवली होती. परंतू पोलिसांना या मुलीचा शोध लागला नाही. यानंतर कामठी जवळ दोन तरुणांचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच या घटनेचा उलगडा झाला आहे.
हे वाचलं का?
नागपूर हादरलं! पत्नी, मुलीची हत्या करून स्वतः घेतला गळफास
मृत जोडपं हे नागपूरच्या कामठी भागात राहणारं होतं. ज्यात मुलीचं वय हे १६ तर मुलाचं वय हे १७ वर्ष होतं. मुलीच्या घरच्यांना हे प्रेमप्रकरण मंजूर नसल्यामुळेच या जोडप्याने आत्महत्या केल्याचं कळतंय. आपल्या प्रेमाला घरच्यांनी विरोध केल्यानंतर मुलीने घरात खूप तमाशा केला होता. मुलीच्या आईने ती गायब झाल्याची तक्रार देताना या गोष्टीचा उल्लेख केला होता. सहा दिवसांपूर्वी हे जोडपं पळून गेलं होतं. ज्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
वाशिममध्ये बापाचं क्रूर कृत्य! एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT