Rane Vs Shivsena : नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिकचे पोलीस पथक रवाना
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटताना दिसत आहे. नारायण राणेंविरोधात शिवसेनेतून संप्तत भावना व्यक्त होत असून, अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. दरम्यान, राणे यांना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीय […]
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटताना दिसत आहे. नारायण राणेंविरोधात शिवसेनेतून संप्तत भावना व्यक्त होत असून, अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. दरम्यान, राणे यांना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी याची माहिती दिली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सोमवारी तोल सुटला. ‘मी असतो, तर कानाशिलात चढवली असती’, असं विधान राणे यांनी केलं. या विधानाचे तीव्र पडसाद उमटले असून, राणेंवर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसनही टीकास्त्र डागलं आहे.
दरम्यान, राणे यांच्याविरुद्ध नाशिकसह चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, नाशिकचं पोलीस पथक अटक करण्यासाठी रवाना झालं आहे. नारायण राणे यांची कोकणात जन आशीर्वाद रॅली सुरू असून, त्या ठिकाणी हे पथक जाणार आहे.
हे वाचलं का?
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्याविरुद्ध चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे, नाशिक येथे प्रत्येकी एक तर रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये दोन गुन्हे दाखल झाले असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Narayan Rane: ‘मी काय नॉर्मल माणूस आहे का?, वर आमचं पण सरकार आहे’, राणेंची पहिली प्रतिक्रिया
ADVERTISEMENT
पोलीस पथक कोकणच्या दिशेनं रवाना
ADVERTISEMENT
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आदेश काढले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नारायण राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पांडे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना आदेश दिले आहेत.
नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात यावं. नारायण राणे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये असून, नाशिक पोलीसांचं पथक त्यांना अटक करण्यासाठी रवाना झालं आहे.
Shiv Sena vs Rane: कोंबडी चोर म्हणत शिवसैनिकांची राणेंवर टीका, दादरमध्ये भलं मोठं बॅनर
माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये. #JanAshirwadYatra pic.twitter.com/AmYmO2ae7n
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
‘मी केंद्रीय मंत्री; चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले गेले’
या प्रकरणावर बोलताना नारायण राणे यांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ‘माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये’, असं राणे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT