Narayan Rane : “फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला आवडत नाही, पण…”
Narayan rane slams uddhav thackeray and sanjay Raut : देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) म्हणायला आवडत नाही, पण म्हणावं लागतं, असं विधान करत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याच कार्यक्रमात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर […]
ADVERTISEMENT
Narayan rane slams uddhav thackeray and sanjay Raut : देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) म्हणायला आवडत नाही, पण म्हणावं लागतं, असं विधान करत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याच कार्यक्रमात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकेचे बाण डागले. (narayan rane says i don’t like to called devendra fadnavis as deputy chief minister)
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, “या जिल्ह्यात मला 33 वर्षे पूर्ण झाली. या जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझं कार्यक्षेत्र मुंबई. 90 साली आलो आणि तेव्हापासून मी या जिल्ह्यात काम करतोय. शिवसेनेतून सुरूवात झाली. त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपत आहे. आता हे शेवटचं, यानंतर कोणताही पक्ष नाही. मी ज्या पक्षात असतो, शंभर टक्के असतो.”
“हा जिल्हा विकास करेल, पण कपाळ करंटे मध्ये मध्ये येतात. त्यांना विचार की काय केलं? रस्त्यासाठी काय केलं, शिक्षणासाठी काय केलं, रोजगारासाठी काय केलं? अडीच वर्षात काय केलं?”, असा सवाल करत राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
हे वाचलं का?
Satyajeet Tambe: मी जर प्रदेशाध्यक्ष असतो, तर…; तांबेंचं मोठं विधान
ठाकरेंचे दोन डब्बे बंद झाले, राणेंचा खोचक सवाल
“56 वर्षे झाली शिवसेनेला. पहिल्या 45 वर्षांमध्ये साहेब असेपर्यंत… शिवसेना घडायला, वाढायला कोकणाने आधार दिला. मी म्हणत नाही नारायण राणे. महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात वणवण फिरणारे कोकणी होते. मग उद्धवा, अडीच वर्षात काय केलं? आलास दोनदा मासे खायला. डबे कुठून जातात मला माहितीये. त्यातील दोन डब्बे बंद झाले. काय दिलं?”, असा खोचक सवाल राणे यांनी ठाकरेंना केला.
ADVERTISEMENT
“कोकणात जिथे प्रकल्प येतात, तिथे विरोध. एनरॉन आला, त्याला विरोध आणि कामं कुणी घेतली? त्या प्रकल्पात जास्त गाड्या कुणाच्या होत्या? कंत्राटदार कोण होते? हे राजन साळवी पण कंत्राटदार होते, आता आमदार आहेत”, असं राणे म्हणाले.
तर पळता भुई थोडी होईल -नारायण राणे
“शिक्षण क्षेत्रात आम्ही काम केलं. स्वतःच्या पैशानं केलं. सरकारच्या पैशाने नाही केलं. यांच्या प्रश्नानांना उत्तर मी नाही देणार, मी जे काही द्यायचं, ते त्याचवेळी देणार. देवेंद्र फडणवीस बोलायला लागले आणि आमचे फटाके लागले. मलाही फटाके काढता येतात. काढेन ना तेव्हा पळता भुई थोडी होईल. जिल्ह्यात पण राहू देणार नाही”, असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.
ADVERTISEMENT
Uddhav ठाकरेंनी आपल्या आमदारांवर डोळे झाकून एवढा विश्वास का टाकला?
“मी सहन करतोय ही माझी अडचण आहे. भाजपमध्ये सहनशील, विचारसरणीचे सर्व लोक आहेत. आता आपण पण त्यांच्यात बसतो, मग तसं व्हायला पाहिजे. तसं दाखवायला पाहिजे. म्हणून कृती करतो. त्याचा फायदा घेऊ नका”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.
संजय राऊतांवर टीकास्त्र, नारायण राणे म्हणाले…
“एक कोण पत्रकार आहे. नोकरीदार नेता. आहे दिल्लीच्या कक्षेत आहे. कधीतरी होईल भेट, कुठेतरी होईल. दुसरे इथे. रात्री दिसत नाही, दिवसा दिसतात. पत्रकार त्यांचे बाईट घेतात. एक शाळा बांधली? रस्ता बांधला? खासदार फंड दिला? नाणारच्या त्या गावांमध्ये किती जागा घेऊन ठेवल्या? आमच्या कुठे जागा आहेत सांगा? मला आमच्या लोकांना सांगायचं की बाळासाहेबांनंतर शिवसेना फक्त टक्केवारी करणारी… महापालिका 25 वर्षे लुटली. संसार उभे केले. देश-परदेशात गुंतवणूक केली. मुंबई महापालिकेवर”, अशी टीका राणे यांनी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना नारायण राणे म्हणाले, “आनंद मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून एक कर्तबगार व्यक्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री, मला आवडत नाही शब्द बोलायला तरी बोलावा लागतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.”
“कोकणी माणसाने मेहनत घेऊन कष्टाने शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर आणली. राज्यात शिवसेना नेली. त्या कोकणाकडे, कोकणी माणसाकडे… त्याच्या नोकरी धंद्याकडे अडीच वर्षात पाहिलं नाही. कसली शिवसेना? शिवसेना मी पाहिली नाही, तर अनुभवलीये. साहेबांनी शिवसेना रक्तात भिनवली होती”, असंही राणे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT