समीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन?; नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट
एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दारू विक्रीचा परवाना घेतल्याचा दावा मलिकांनी केला असून, समीर वानखेडेंनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक म्हणाले, “समीर वानखेडेंनी आणखी […]
ADVERTISEMENT

एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दारू विक्रीचा परवाना घेतल्याचा दावा मलिकांनी केला असून, समीर वानखेडेंनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक म्हणाले, “समीर वानखेडेंनी आणखी फसवेगिरी केली आहे. त्यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात नोकरीला होते. बोगसगिरी करण्यात ते माहिर होते. त्यांनी १९९७-९८चं जिल्ह्याचं नोंदवही आहे. त्यात हॉटेल सद्गुरू नावे बारचं लायसन्स देण्यात आलेलं आहे. जे लायसन्स देण्यात आलं ते समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे आहे. त्या परवान्याचे सातत्याने समीर वानखेडेंच्या नावान नुतनीकरण केलं गेलं आहे. २०२२ पर्यंत नुतनीकरण करण्यात आलेलं आहे.”
“हे लायसन्स देताना समीर दाऊद वानखेडे यांचं वय त्यावेळी १७ वर्ष १० महिने आणि १९ दिवस इतकं होतं. त्यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते. एका अल्पवयीन मुलाच्या नावे लायसन्स देण्याचं काम झालं, हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. १७ वर्ष १० महिने आणि १९ महिने वय असताना हे दिलं गेलं, जेव्हा की १८ वर्षा खालील व्यक्तीला लायसन्स दिलं जात नाही. या लायसनवर वाशीमध्ये हॉटेल सदगुरू सुरू आहे.”
“१९९७ पासून ते आजपर्यंत म्हणजे २४-२५ वर्ष झाले. एकदाही ते लायसन्स सस्पेंड झालेलं नाही. एकदाही असं झालेलं नाही की, त्यावरचा व्यवसाय बंद होता. त्यांनी घोटाळा करून लायसन्स घेतलं आणि समीर वानखेडेच्या नावे तो बार सुरू आहे.”









