NCP च्या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेस विरोधात नाराजीचा सूर, नवाब मलिक म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुका, त्यासंबंधीची रणनीती, ओबीसींचं राजकारण या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. मात्र बैठकीत काही आजी-माजी आमदारांनी तक्रारीही केल्या. महाविकास आघाडीमधे सत्तेत असलेले काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांबद्दल या तक्रारी होत्या. याबाबत पत्रकारांनी नवाब मलिक यांना विचारलं असता त्यांनी याबाबत उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

काय म्हणाले नवाब मलिक?

तीन पक्षांचं सरकार सत्तेत आहे, प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना झुकतं माप देत असतो. दोन पक्षांचं सरकार असतानाही हीच तक्रार होती. कधी कधी एका पक्षाचं सरकार असतानाही ही तक्रार असते. तीन पक्षांचं सरकार असल्याने प्रत्येक प्रश्न सुटेल असं नाही. जे आमदार किंवा पराभूत उमेदवार आहेत त्यांच्या तक्रारी ऐकल्या. राष्ट्रवादीचे मंत्री त्याकडे लक्ष देतील,’ असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

काही जिल्ह्यांमध्ये आम्ही पालकमंत्री असताना किंवा आमचं वर्चस्व असताना काँग्रेसच्या तक्रारी येऊ शकतात काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचं वर्चस्व असताना आमच्या किंवा शिवसेनेच्या तक्रारी होऊ शकतात. जिथे जिथे एक पक्षाचं सरकार आहे. त्या ठिकाणी सुद्धा आमदारांचे मतभेद असतात. प्रत्येक आमदाराला आणि नेत्यांना असं वाटतं आपल्या मतदारसंघातील कामं जास्त झाली पाहिजेत. हा काही मोठा प्रश्न असं आम्ही मानत नाही असंही नवाब मलिक म्हणाले.

आपल्याला बराच काळ निवडणुका टाळता येत नाहीत. एखादा कायदा करून सर्व पक्षांना एकजूट करून, एकमत करून आरक्षण देता येते का?, हे पाहावं लागेल. ही सगळी परिस्थिती असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे. करोनाची स्थिती नियंत्रणात असताना ते निवडणुका घेऊ शकतात. अशी भूमिका ते मांडत आहेत. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला निवडणुका घेतल्या पाहिजेत. जर दुसरा पर्याय उरला नाही. तर रिक्त झालेल्या ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाचा आहे असंही मलिक यांनी स्पष्ट केलं

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT