CM शिंदेंचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’ : बड्या नेत्याचा पक्षात प्रवेश; तात्काळ मोठी जबाबदारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ठाणे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि युती सरकारला पाठिंबा जाहीर केला. याबाबत स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करुन माहिती दिली.

ADVERTISEMENT

दरम्यान प्रवेशानंतर लगेच म्हात्रे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. म्हात्रे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्रही त्यांना शिंदे यांनी सुपूर्द केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी आमदार अशोक पाटील, ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, उपनेते प्रकाश पाटील, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

हे वाचलं का?

सुरेश म्हात्रे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आपण आपल्या वैयक्तिक कारणाने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हात्रे यांनी राजीनाम्यात म्हटले होते. मात्र त्याचवेळी ते भाजप किंवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जातील असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

म्हात्रे पूर्वी शिवसेनेमध्ये कार्यरत होते. शिवसेनेत त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेत आरोग्य व बांधकाम समितीचे सभापतीपद भूषवले होते. गेल्यावर्षी त्यांनी शिवसेनेसह जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. म्हात्रे यांच्या प्रवेशाने ठाणे ग्रामीण भागात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद वाढण्यास आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची ताकद कमी करण्यासाठी मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT