सचिन वाझे पांढरा कुर्ता घालून पुन्हा त्याच मार्गावर, अँटिलीया बाहेर NIA कडून Crime Recreation
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंकडून NIA ने क्राईम रिक्रेएशन करवून घेतलं आहे. अँटिलीया समोर ज्या भागात स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पाठमोरी जाताना दिसत होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून सचिन वाझेच असल्याचा NIA ला संशय आहे. याची पुष्टी […]
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंकडून NIA ने क्राईम रिक्रेएशन करवून घेतलं आहे. अँटिलीया समोर ज्या भागात स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पाठमोरी जाताना दिसत होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून सचिन वाझेच असल्याचा NIA ला संशय आहे. याची पुष्टी करण्यासाठी NIA ने शुक्रवारी मध्यरात्री अँटिलीयासमोर सचिन वाझे यांच्याकडून क्राईम रिक्रिएशन करवून घेतलं.
ADVERTISEMENT
मध्यरात्री अँटिलीया बाहेरचे रस्ते मुंबई पोलिसांनी दोन्ही बाजूंनी बंद केले. यानंतर NIA च्या पथकाने सचिन वाझेंना घटनास्थळी आणून त्यांना एक पांढरा कुर्ता दिला, हा कुर्ता घालून वाझेंना त्या मार्गावर चालायला सांगितलं. यावेळी उपस्थित असलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींना NIA च्या अधिकाऱ्यांनी शूट करण्यासाठी मोबाईल लाईटचा वापर करु नका असंही सांगितलं. अंदाजे १ तास NIA चे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी वाझेंना या मार्गावर पांढऱ्या कुर्त्यात चालायला लावलं. CCTV फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती ही वाझेच आहे हे कन्फर्म करुन घेण्यासाठी NIA ने हे क्राईम रिक्रिएशन केल्याचं कळतंय.
स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास NIA ने हाती घेतल्यानंतर अनेक महत्वाचे पुरावे समोर आले होते. गाडी अँटिलीयाच्या समोर ठेवण्याच्या आधी वाझे यांनी दोन कुर्ते घेतले होते. ज्यातला एक कुर्ता त्यांनी मुलुंड टोल नाक्याजवळ जाळून टाकला होता. वाझे यांचं कार्यालय आणि घरात केलेल्या छापेमारीत NIA च्या हातात काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. घटनास्थळी NIA सोबत सेंट्रल फॉरेन्सिक टीमचे काही सदस्य होते. आज पुण्यावरुन आलेल्या पथकाने NIA ला स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडीच्या तपासात महत्वाची मदत केल्याचंही बोललं जातंय.
हे वाचलं का?
Antilia case: एनआयएकडून जप्त करण्यात आलेल्या पाच वाहनांची तपासणी
दरम्यान, सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान NIA च्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं आहे. वाझे तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांची अजून योग्य पद्धतीने चौकशी करु शकत नसल्याचं NIA ने कोर्टात सांगितलं.
ADVERTISEMENT
वाझे यांच्या चौकशीदरम्यान कोर्टाने त्यांच्या वकीलांना हजर राहण्याची परवानगी दिली आहे. परंतू वाझे यांचे वकील हजर नसल्यामुळे ते तपासात सहकार्य करत नसल्याचं NIA ने सांगितलं. ज्याला उत्तर देताना वाझे यांच्या वकीलांनी त्यांची बाजू मांडणाऱ्या वकीलांच्या पथकातील एक सदस्य साजल यादव हे खास या केससाठी NIA ऑफिसजवळील हॉटेलमध्ये राहत आहेत. चौकशीदरम्यान त्यांना कधीही बोलवता येऊ शकतं, परंतू NIA ने त्यांना चौकशीदरम्यान बोलावलंच नसल्याचं सांगितलं. दरम्यान वाझे यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनीवार शुक्रवारी ATS ने देखील ठाणे सत्र न्यायालयात आपलं म्हणणं मांडलं. सचिन वाझे यांची NIA कस्टडी २५ मार्चला संपते आहे. दरम्यान ठाणे सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३० मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT