नाना पटोलेंची पंतप्रधानांबाबतची भाषा आक्षेपार्ह, गुन्हा दाखल करून अटक करा-नितीन गडकरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वापरलेली भाषा आक्षेपाह्र आहे, गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात येतं आहे. अशात आता नितीन गडकरी यांनी ट्विट करून नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे.

काय आहे नितीन गडकरींचं ट्विट?

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.

काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

नाना पटोले यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यात पटोले हे मोदींच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त करताना दिसत आहे. पटोले यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपनेही कडाडून टीका केली आहे. या विधानाचा पंजाबमधील सुरक्षेत झालेल्या चुकीशी भाजपकडून संबंध लावण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पेटोल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सगळीकडे चर्चा होत असून, त्यामध्ये नाना पटोलेंनी वादग्रस्त विधान केलं आहे.

“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे…,” असं पटोले म्हणताना दिसत आहेत.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. “कॅाग्रेसचे नाना पटोले यांना ‘समुपदेशना’ची गरज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी यांचा मोदी द्वेष नवा नाही. या द्वेषापोटी आपण काय बोलतो आहोत, याचं भान त्यांना राहिलेलं नाही. मोदींजीच्या विरोधात वारंवार गरळ ओकल्याने आपल्याला राहुल गांधी ‘बक्षिसी’ देतील या समजापोटी ते वारंवार बेताल होऊ लागले आहेत. आज नानाजी जे काही बोलले आहेत ते पाहता त्यांच्या ‘समुपदेशना’ची गरज आहे, असं दिसतं आहे. यापेक्षा त्यांच्या वक्तव्यावर वेगळया मार्गाने व्यक्त होता येणे अवघड आहे”, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT