Nitin Gadkari: ”चंद्रशेखर बावनकुळेंनी बायकोसुद्धा पळवून आणली होती”
नागपूर: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी काल चंद्रशेखर बाववकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. आज नागपूरमध्ये बावनकुळेंचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक करताना एक किस्साही सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. चंद्रशेखर बावनकुळेंविषयी काय म्हणाले […]
ADVERTISEMENT
नागपूर: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी काल चंद्रशेखर बाववकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. आज नागपूरमध्ये बावनकुळेंचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक करताना एक किस्साही सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
ADVERTISEMENT
चंद्रशेखर बावनकुळेंविषयी काय म्हणाले नितीन गडकरी?
”आपली पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आपल्या पक्षात मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यांच्या पोटात प्रधानमंत्री ही पद्धत नाही. आपल्या पक्षात कोणी म्हणू नए की माझ्या बायकोला तिकीट द्या, मुलाला तिकीट द्या ते चालणार नाही. पण एखाद्याच्या मुलाला जनतेने म्हंटल तिकीट द्या तर त्याला जरुर तिकीट द्या असे नितीन गडकरी म्हणाले.
पुढे नितीन गडकरींनी चंद्रशेखर बावनकुळेंचा एक किस्सा सांगितला. ” चंद्रशेखर बावनकुळेंचं जीवन हे संघर्षमय जीवन आहे. त्यांनी बायकोसुद्धा पळवून आणली होती. बावनकुळेंनी हे कसं काय केलं हे तरुण कार्यकर्त्यांसाठी सिक्रेट आहे. पण जेष्ठ कार्यर्त्यांनी या भानगडीत पडू नये” यानंतर सभागृहात एकच हसा पिकला.
हे वाचलं का?
”कार्यकर्ते दोन प्रकारचे असतात. एक मेहेनत करणारे दुसरे फोटो पुरते. बावनकुळे यांनी सर्व जनतेचं प्रेम मिळवलं खूप मेहेनत केली. सांगू नये पण बावनकुळे यांच्यात इतकं कर्तृत्व आहे की ते बाईचा माणूस आणि माणसाची बाई करू शकतात. ऑटोरिक्षा चालक ते प्रदेश अध्यक्ष त्यांचा प्रवास आहे. राजकारणात जय पराजय होत असतो, यश अपयश येत असतं पण निष्ठेनं काम करणारा हा कार्यकर्ता असतो. बावनकुळे यांना 2019 मध्ये तिकीट नाही मिळालं नाही तरी तक्रार केली नाही. जो प्रदेश अध्यक्ष होतो तो काय काय होतो ते सांगायची गरज नाही.” असे नितीन गडकरी म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे आपल्या भाषणात काय म्हणाले?
”मी अमरावती दौऱ्यावर असताना मला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आला आणि मला प्रदेशाध्यक्ष जवाबदारी देत असल्याचं सांगितलं. मी त्यांना अभिवचन दिलं माझ्या वर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पक्षाच्या प्रतिमेला धक्का न लागू देता मी माझी जवाबदारी पार पाडेल. नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवलं. मला नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन मिळेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
ADVERTISEMENT
”मी छत्रपती सेनेत काम करत असताना मला नितिन गडकरी यांनी बोलविले. गोपीनाथ मुंडे यांच्या जनसंघर्ष यात्रेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याकाळात माझे पुनर्वसनाचे ४५ लाख तेव्हाचे मंत्री सुनील केदार यांनी अडविले होते तेव्हा नितिन गडकरी यांनी ते मिळवून दिले. मी कधी आमदार होईल अस वाटलं देखील नव्हतं. मला पक्षात सरचिटणीस म्हणून जवाबदारी फडणवीस यांनी दिली. मी युवा वॉरियर्स संकल्पना आणली. २०२४ पर्यंत २५ लक्ष कार्यकर्ते तयार करायचा संकल्प केला आहे. प्रत्येक बूथवर ३० नेते तयार करायचे आहेत. आधीच्या सरकारमधील पालकमंत्री झेंडा वंदन ते झेंडा वंदन होते”.
ADVERTISEMENT
”देवेंद्र फडणवीस यांनी ४० दिवसात ५२ महत्वाचे निर्णय घेतले. हार पुष्पने स्वागत करण्यापेक्षा शेतकऱ्यांना काही मदत करता येईल का असा प्रयत्न करू. ओबीसी आरक्षणाच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी संघर्ष केला सॉलिसिटर जनरल यांना आरक्षण का महत्वाचं हे पटवून कोर्टात बाजू मांडून आरक्षण मिळवून दिलं. प्रदेशाध्यक्षपद काटेरी मुकुट आहे. राज्यातील ७५ टक्के निवडणुका समोर आहे. तिन्ही पक्ष देखील समोर आले तरी त्यांना भाजप काय हे दाखवून द्यायचं आहे. सत्ता आणि संघटना हे सोबत काम करतील” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT