महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी Lockdown कायम, १५ जूनपर्यंत शूटींगसाठी परवानगी नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी रविवारी संवाद साधत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे निर्बंध उठवले जातील अशी अनेकांची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे महाराष्ट्रातलं मनोरंजन क्षेत्र डोळे लावून बसलं होतं, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. राज्यात चित्रीकरणासाठी सरकारने अजून परवानगी दिलेली नाहीये. महाराष्ट्रात लॉकडाउनची […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी रविवारी संवाद साधत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे निर्बंध उठवले जातील अशी अनेकांची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे महाराष्ट्रातलं मनोरंजन क्षेत्र डोळे लावून बसलं होतं, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. राज्यात चित्रीकरणासाठी सरकारने अजून परवानगी दिलेली नाहीये.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर अनेक मराठी सिरीअलच्या निर्मात्यांनी आपला मुक्काम परराज्यात हलवला. सिल्वासा, दीव-दमण, गोवा, जोधपूर यासारख्या ठिकाणी अनेक मराठी मालिकांचं शुटींग सुरु आहे. परंतू यासाठी निर्मात्यांवर चांगलाच भार पडत असून महाराष्ट्रात नियमांचं पालन करुन चित्रीकरणाला परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत होती. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबंधित निर्मात्यांशी चर्चा करुन सरकार दरबारी हा प्रश्न मांडला. या चर्चेदरम्यान आगामी काळात राज्यात चित्रीकरणाला सशर्त परवानगी दिली जाऊ शकते असे संकेत मिळत होते.
परंतू मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात यासंबंधी काहीही उल्लेख केला नाही. त्यामुळे शुटींगला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे अनेक निर्मात्यांनी परराज्यातला आपला मुक्काम वाढवला आहे. परराज्यांत शुटींग करावं लागत असल्यामुळे अनेक मालिकांच्या निर्मात्यांचं बजेट दुप्पट झालं आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा या मुद्द्यावर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्व निर्मात्यांचं लक्ष लागलेलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT