Vaccination: पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ घोषणेनंतर, आता खूपच चांगली बातमी आली समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आता हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कालच (8 जून) मोठी घोषणा केली की, देशातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण (Free Vaccination) होणार असून ते केंद्र सरकारतर्फे केलं जाईल. ही घोषणा होऊ 24 तास उलटत नाही तोच आता चांगली बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने देशातील दोन लस कंपन्यांना तब्बल 74 कोटी डोसची (Vaccine) ऑर्डर दिली आहे.

माध्यमांना संबोधित करताना आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव, लव अग्रवाल म्हणाले की, जर आपण पॉझिटिव्हिटी रेटबद्दल बोललो तर तो आता साप्ताहिक 6.3 टक्के झाला आहे. खरं तर 4 ते 10 मे दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट हा तब्बल 21.4 टक्के एवढा होता. त्यामुळे आता पॉझिटिव्हिटी रेटमध्ये तब्बल 70 टक्क्यांची घट झाली आहे.

त्याचबरोबर आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 23.62 कोटी डोस देण्यात आले आहेत. 18 वर्षांवरील नागरिकांना 3.06 कोटी डोस दिले गेले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खासगी रूग्णालयांमध्ये Covaxin, Covishield आणि Sputnik V मिळणार ‘या’ किंमतीला, मोदी सरकारकडून दर निश्चित

त्याचबरोबर नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी लसीचे 74 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. यात 25 कोटी डोस हे कोव्हिशिल्ड (Covishield) आणि 19 कोटी कोव्हॅक्सिनचे (Covaxin) असणार आहेत.

ADVERTISEMENT

याशिवाय सरकारने बायोलॉजिक्स ई लिमिटेड लसीचे 30 कोटी डोस खरेदी करण्याचेही आदेशही दिले आहेत. जे सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होतील. तसंच सरकारने लस कंपन्यांना 30 टक्के रक्कम आगाऊ जारी केली आहे.

ADVERTISEMENT

पॉल पुढे म्हणाले की, खासगी रुग्णालयांच्या लसींची किंमत ही लस उत्पादकांकडून ठरविली जाईल. त्याचबरोबर, राज्य खासगी क्षेत्राच्या एकूण मागणीवर लक्ष ठेवतील. याचा अर्थ असा आहे की, त्याकडे कोणत्या सुविधांचे नेटवर्क आहे आणि किती डोसची आवश्यकता आहे हे ते पाहतील.

Big News : 21 जूनपासून 18 वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस-पंतप्रधान

दुसरीकडे, लसी संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांबाबत ते म्हणाले की, नव्या गाइडलाइननुसार, 75 टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करतील. राज्यांना ही लस विनामूल्य दिली जाईल. लोकसंख्या, संसर्गाची स्थिती आणि त्या राज्यात लसीकरण करण्याची गती आणि लसींचा कमी अपव्यय या गोष्टी लक्षात घेऊन संबंधित राज्यांना अधिक लसींचे डोस दिले जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घोषणा केली होती की 21 जूनपासून योग दिनापासून राज्यांना मोफत लस दिली जाईल.

Vaccination: लसीकरणानंतरही 475 लोकांचा मृत्यू झाला आहे, आरोग्य मंत्रालयाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

भारतात मागील 63 दिवसानंतर मागील 24 तासात 1 लाखांपेक्षा कमी कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच रोज संसर्ग होणार्‍या नमुन्यांचा दरही 4.62 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात सर्वात कमी 86,498 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

यापूर्वी 2 एप्रिल रोजी 24 तासात 81,466 नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर आजपर्यंत दररोज रुग्णांमध्ये वाढ दिसत होती. आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत एकूण 36,82,07,596 नमुने तपासण्यात आले आहेत.

गेल्या 15 दिवसांपासून, संसर्गाचे दररोजचे दर 10 टक्क्यांपेक्षा कमी राहिले आहेत. त्याच वेळी, साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण देखील 5.94 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 13,03,702 कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर उपचार सुरु आहेत. जे एकूण रुग्णांच्या तुलनेने 4.50 टक्के इतके प्रमाण आहे. दरम्यान, देशातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण 94.29 टक्के इतके आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT