Naatu Naatu Win oscar: ऑस्करमध्येही ‘नाटू नाटू’चे घुमले सूर! पटकावला ‘बेस्ट ओरिजनल साँग’ अवॉर्ड
naatu naatu oscar winner: भारतीयांना गगन ठेगणं वाटावं असंच ऑस्करमध्ये घडलंय. 95व्या अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने बेस्ट ओरिजनल साँगचा (best original song oscar 2023) पुरस्कार पटकावला. बेस्ट ओरिजनल साँग श्रेणीत नामांकन मिळवणारा आरआरआर हा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. यापूर्वी नाटू नाटू […]
ADVERTISEMENT
naatu naatu oscar winner: भारतीयांना गगन ठेगणं वाटावं असंच ऑस्करमध्ये घडलंय. 95व्या अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने बेस्ट ओरिजनल साँगचा (best original song oscar 2023) पुरस्कार पटकावला. बेस्ट ओरिजनल साँग श्रेणीत नामांकन मिळवणारा आरआरआर हा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. यापूर्वी नाटू नाटू गाण्याला संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ग्लोडन ग्लोब अवॉर्डही मिळालेला आहे. (RRR’s Naatu Naatu declared Best Original Song at 95th Academy Awards)
ADVERTISEMENT
डायरेक्टर एसएस राजमौली यांच्या RRR सिनेमाला बेस्ट ओरिजनल सॉंग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं. या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळवणारी RRR हा पहिलाच भारतीय सिनेमा होता. त्यामुळे या सिनेमातील सॉंग अवॉर्ड जिंकेल असा फॅन्सना विश्वास होता. आणि अखेर नाटू नाटू गाण्याने 95 व्या ऑस्कर अवॉर्ड शोमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकलां.संगीतकार एमएम कीरावानी आणि गीतकार चंद्रबोस यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
The Elephant Whisperers: ऑस्करमध्ये भारताचा डंका! द एलिफंट व्हिस्परर्सने घडवला इतिहास
हे वाचलं का?
95 व्या ऑस्कर अवॉर्ड (Oscar Award)शोला आजपासून सुरुवात झाली आहे. लॉस एंजलिसमध्ये पार पडत असलेल्या या अवॉर्ड शोसाठी अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. तर बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोन (Deepika Padukon) या अवॉर्ड शोमध्ये प्रेजेंटरच्या भूमिकेत आहे.
Satish Kaushik यांचा मृत्यू कशामुळे, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून कारण आलं समोर?
ADVERTISEMENT
ऑस्कर्समध्ये भारताची शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म द एलिफेंट व्हिस्परर्सने (The Elephant Whisperers) अवॉर्ड जिंकून इतिहास रचलाय. प्रोड्यूसर गुनीत मोंगा (guneet monga) याच्या या सिनेमाने द एलिफेंट व्हिस्परर्सने बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्रीचा अवॉर्ड जिंकला आहे. द एलिफेंट व्हिस्परर्सने (The Elephant Whisperers) ऑस्कर अवॉर्ड जिंकल्यानंतर गुनीत मोंगाने (guneet monga) आनंद व्यक्त केला आहे.हा भारताचा पहिला ऑस्कर आहे, जो या कॅटेगरीत देण्यात आला आहे. गुनीतने सगळ्यांचे आभार मानून महिलांना स्वप्न पाहण्याचा संदेश दिला आहे.
ADVERTISEMENT
Kapil Sharma: शाहरूख खान कपिलला म्हणाला,”तू ड्रग्ज घेतोस का?”, नेमकं काय घडलं होतं?
“ऑस्कर हे भारतासाठी अजूनही एक स्वप्नच राहिले असते, पण एका माणसाच्या दृष्टी, ध्यैर्य आणि विश्वासामुळे हे शक्य झाले आहे, ते म्हणजे एसएस राजामौली, अशी प्रतिक्रिया अभिनेता चिरंजीवी यांनी नाटू नाटू गाण्याला बेस्ट सॉंगचा अवॉर्ड मिळाल्यानंतर दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT