लसीकरण कँप की कोरोनाला आमंत्रण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

महापालिका निवडणुका जवळ आल्यानंतर राजकीय पक्षांकडून मुंबईत नागरिकांसाठी लसीकरण कँप आयोजित करण्याला सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

परंतू या कँपच्या निमीत्ताने सरकारमध्ये असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं बेजबाबदार आयोजन दिसून आलं.

ADVERTISEMENT

शिवसेना पक्ष आणि रिलायन्स फाऊंडेशनतर्फे बोरिवली येथे लसीकरण कँप आयोजित करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

परंतू या कँपच्या बाहेर जमा झालेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आणि त्यांची व्यवस्था करण्यात शिवसेना कार्यकर्ते पूर्णपणे फोल ठरले.

बोरिवलीच्या म्हात्रे वाडीतील साई कृपा हॉलमध्ये या कँपचं आयोजन करण्यात आलं होतं

परंतू या लसीकरणासाठी हॉलबाहेर जमा झालेली गर्दी पाहता हे लसीकरण केंद्र आहे की कोरोनाला आमंत्रण देणारं ठिकाण असा प्रश्न तुम्हाला पडेल

एकीकडे मुख्यमंत्री लोकांना गर्दी करु नका सांगत आहेत. दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकाऱ्यांमुळे एका लसीकरण केंद्रावर गर्दी झालेली पहायला मिळाली.

सरकारी केंद्रात अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे सध्या अनेक लोकं खासगी लसीकरणाकडे आपली पावलं वळवत आहेत

कोरोना लसीकरण कँप आयोजित करण्यामागचा हेतू चांगला असला तरीही त्यानिमीत्ताने झालेली गर्दी आणि ढिसाळ नियोजन नक्कीच योग्य नाही.

लसीकरण केंद्राच्या आत नागरिकांची व्यवस्थीत सोय करण्यात आलेली पहायला मिळाली.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा सर्व नियमांचं लसीकरण केंद्रात पालन होताना दिसत होतं.

परंतू दुर्दैवाने लसीकरण केंद्राबाहेरचं चित्र चिंतेत भर टाकणारं होतं.

त्यामुळे लसीकरण कँपचं आयोजन करुन शिवसेनेने काय मिळवलं असा प्रश्न आता स्थानिक लोकं विचारत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT