Raj Thackeray BirthDay : नाशिकमध्ये पेट्रोल 53 रूपये लिटर, मनसेचा उपक्रम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने नाशिकमध्ये पेट्रोल 53 रूपये प्रति लिटर या दराने दिले गेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. नेत्याच्या वाढदिवसाची मनसेने कोणतीही बॅनरबाजी न करता सामन्य जनतेला दिलासा देण्यासाठी हे करत असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र येणार का? दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीच […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने नाशिकमध्ये पेट्रोल 53 रूपये प्रति लिटर या दराने दिले गेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. नेत्याच्या वाढदिवसाची मनसेने कोणतीही बॅनरबाजी न करता सामन्य जनतेला दिलासा देण्यासाठी हे करत असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ठाकरे बंधू एकत्र येणार का? दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले…
कोरोना काळात कृष्णकुंजवर मनसेने गर्दी करू नये ह्या आवाहनानंतर नाशिक मनसेने हा उपक्रम राबवला तर नागरिकांना हा मनसेचा प्रयत्न आवडला, त्यांनी राज ठाकरे यांचे अभिनंदन हि केले , पण त्याचबरोबर पेट्रोलची वाढती दरवाढीवर अशी सूट नेहमीच मिळाली पाहिजे अशी अपेक्षा बोलून दाखवली . मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या मुलाखती, भाषणं आणि त्यांच्या व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस म्हटल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी होऊ शकते या अनुषंगाने राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी गर्दी करू नये असं म्हटलं आहे. गेल्या वर्षीही कोरोना होता आणि यावर्षीही कोरोनाचं संकट कायम आहे. या संकटात वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय तर राज ठाकरेंनी घेतलाच. पण गर्दी न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
हे वाचलं का?
१ रुपयात पेट्रोल, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त डोंबिवलीत शिवसेना नेत्याचा उपक्रम
आता नेत्याच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी कार्यकर्ते काय करतील ह्याचा भरवसा नसतो , रविवारी राज ठाकरे यांचे पुतणे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबीवलीत १ रु लिटर पेट्रोल दिले, तर मनसेने आज लिटर मागे ५३ रुपयाची सूट दिली , राजकीय अहमिकेत नागरिकांना किंचितसा का होईना पण दिलासा मिळाला.
ADVERTISEMENT
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल 100 रूपये लिटरच्या पुढे गेलं आहे. अशात दोन नेत्यांच्या वाढदिवसांचं औचित्य साधून आधी डोंबिवलीत 1 रूपया लिटरने पेट्रोल विकण्यात आलं. तर नाशिकमध्ये 53 रूपये लिटरने पेट्रोल विकत मनसे कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT