प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे ५ कोटींची खंडणीची, एकाला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडून ५ कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी न दिल्यास घोडावत यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी हातकणंगलेमधून एकाला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

५६ वर्षीय घोडावत हे हातकणंगले तालुक्यातील जयसिंगपूरमध्ये राहतात. १३ ते १८ जून या कालावधीत घोडावत यांना Whats App, SMS आणि Whats App Call वरुन पाच कोटींची खंडणी मागण्यात आली. यानंतर घोडावत यांनी हातकणंगले पोलीसांकडे तक्रार दाखल केली. घोडावत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवत रमेशकुमार प्रजापती ठक्कर या आरोपीला अटक केली आहे. याच प्रकरणातील आणखी एक आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी १ लाख रोकड, १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, एक डायरी जप्त केली आहे. घोडावत यांच्याकडे खंडणी वसुलीचा प्रयत्न झाल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT