तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानात सापडले 1 कोटी, रिकाम्या हाती परतणाऱ्या ग्राहकांमुळे फुटलं बिंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबादच्या चेलीपुरा भागात गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे. तांदुळ व्यापाऱ्याच्या दुकानातून पोलिसांनी हवालाच्या माध्यमातून आलेले 1 कोटी 9 लाख 50 हजार रुपये जप्त केले आहेत. या दुकानातूनच औरंगाबादमधले हवालाचे व्यवहार होत असल्याची माहिती समोर येते आहे.

ADVERTISEMENT

चेलीपुरा भागात आशिष साहुजी यांचं तांदळाचं दुकान आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना या दुकानातून हवाला रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मिळाली होती. कालांतराने या दुकानात हवालाचा काही पैसा आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना मिळाली होती. मंगळवारी संध्याकाळी छापेमारी करण्याआधी पोलिसांनी या दुकानावर पाळत ठेवली.

हे वाचलं का?

यावेळी अनेक ग्राहक दुकानात जाऊन कोणताही माल न घेता रिकाम्या हाताने परतत असल्याचं पाहून पोलिसांचा संशय बळावला. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी पाच वाजता दुकानात छापा टाकला. यावेळी चौकशी केली असता तांदळाच्या पोत्यांमागे आणि दुकानाच्या ड्रॉव्हरमध्ये पैशांची बंडल आढळून आली.

या कारवाईत पोलिसांना पैसे मोजण्याच्या मशिनसह दोन डायरी सापडल्या आहेत. ज्यात 30 नोव्हेंबर 2021 पासून काही नोंदी आहेत. परंतू या यादीत कोणत्याही व्यक्तीचं नाव स्पष्ट स्वरुपात न लिहीता सांकेतिक भाषेत लिहीण्यात आली आहेत. त्यामुळे या डायरीतील नावांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT