गुंडाच्या मारहाणीत पोलिसाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुण्यात (Pune) गुंडाच्या (goon) मारहाणीत एका पोलीस (Police) हवालदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार समीर सय्यद हे शहरातील बुधवार पेठ परिसरात श्रीकृष्ण टॉकीज जवळ सार्वजनिक रोडवर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले.

ADVERTISEMENT

दरम्यान, हवालदार सय्यद यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, त्यांच्या मानेतून अधिक रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना केईएम रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

मात्र, जखमी अवस्थेत असताना हवालदार समीर सय्यद यांनी आपल्या जबानीत सांगितलं की, ‘पव्या महाजनने त्यांना मारले आहे.’ त्यांच्या याच जबानीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रविण श्रीनिवास महाजन याच्याविरुध्द 302 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पण अद्याप तरी गुंड प्रविणचा पोलिसांना शोध लागलेला नाही. यासाठी फरासखाना पोलिसांनी वेगवेगळी पथकं नेमली असून त्याचा कसून शोध सुरु करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

कुख्यात गुंड गजा मारणेला अटक, सातारा पोलिसांची मध्यरात्री कारवाई

एका गुंडाने एखाद्या पोलिसाला एवढ्या अमानुषपणे मारहाण करावी आणि त्यात पोलिसाचा मृत्यू व्हावा या गोष्टीवरुन आता पुण्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करुन त्याला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे या सगळ्या घटनेवरुन पुण्यातील पोलीस प्रशासन प्रचंड कमकुवत झाल्याची देखील टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता पुण्याती गुंडांना आवर घालण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे. मागील काही वर्षांपासून पुण्यातील गुंडगिरी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हळहळू त्याचं स्वरुप टोळी युद्धात झालं. आता या गुंडांची थेट पोलिसांची हत्या करण्यापर्यंत मजल गेल्याने सामान्य पुणेकर मात्र चांगलेच धास्तावले आहेत.

ADVERTISEMENT

पुण्यातील तरुणाईला गुंडांचं आकर्षण का वाटतंय?

पुणे पोलीस का ठरत आहेत अपयशी?

पुण्यातील तरुण हे अधिकाधिक प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. ते पाहता पुण्यातील पोलीस हे तरुणांना योग्य मार्गाकडे वळवण्यात अपयशी ठरल्याचं आढळून आलं आहे. ज्याप्रमाणे मुंबईतील संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यात आली त्याचपद्धतीने पुण्यातही कारवाई होऊ शकते. मात्र यासाठी इच्छाशक्ती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच यापुढे पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT