Raj Kundra Arrest : जाणून घ्या, कोर्टात आज काय-काय घडलं?
अश्लील व्हिडीओ बनवून ते Mobile App वर अपलोड केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली. याव्यतिरीक्त नवीन मुंबईतील नेरुळ भागातून रायन नावाच्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. या सुनावणीदरम्यान Additional Chief Metropolitan Magistrate एस.बी.भाजीपाले यांनी राज कुंद्रा आणि […]
ADVERTISEMENT
अश्लील व्हिडीओ बनवून ते Mobile App वर अपलोड केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली. याव्यतिरीक्त नवीन मुंबईतील नेरुळ भागातून रायन नावाच्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
ADVERTISEMENT
या सुनावणीदरम्यान Additional Chief Metropolitan Magistrate एस.बी.भाजीपाले यांनी राज कुंद्रा आणि दुसऱ्या आरोपीला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज कुंद्राला ज्यावेळी कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी सुनावणीदरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या.
टी-शर्ट, जीन्स आणि मास्क घालून आलेल्या राज कुंद्राला त्याचे बुट बाहेर काढून ठेवा असं सांगण्यात आलं. राज कुंद्रा यांचे वकील अब्बाद पोंडा हे याच न्यायालयात आणखी एक केस लढवत होते, त्यामुळे राज कुंद्रा यांना बाकावर बसवून ठेवण्यात आलं. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर ओळख पटवण्यासाठी राज कुंद्रा याला त्याचा मास्क काढायला सांगण्यात आलं. राज कुंद्राला पाहण्यासाठी यावेळी न्यायालयात गर्दी झालेली पहायला मिळाली. यावेळी न्यायाधीशांनी कोरोना महामारी अजुन संपलेली नाही असं म्हणत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असे आदेश दिले.
हे वाचलं का?
Raj Kundra Porongrphy Case : मढ आयलँड येथील ग्रीन व्हिला बंगल्यावर पोलिसांची धाड
तपास अधिकारी किरण बिडवे यांनी कोर्टाला राज कुंद्रा Hotshot या आपल्या App च्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ बनवत असल्याचं सांगितलं. “या प्रकरणात मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गहना वशिष्ठ आणि उमेश कामत (राज कुंद्रा याचा माजी PA) यांना अटक केली होती. यांच्या चौकशीदरम्यान अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या प्रक्रीयेत राज कुंद्रा सहभागी असल्याची माहिती आम्हाला मिळाली.”
ADVERTISEMENT
राज कुंद्राने या App मधली आपली मालकी फरार आरोपी प्रदीप बक्षी याला विकली असली तरीही राज कुंद्रा या App संदर्भातील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून होता. यासाठी राज कुंद्राने एक What’s app Group तयार केला होता ज्याचा Admin तो स्वतः होता. या What’s App Group वर राज कुंद्रा Hotshot App वर व्हिडीओ क्लिप आल्यानंतर आर्थिक देवाण-घेवाण याविषयी चर्चा करायचा. राज कुंद्रा याने Hotshot मधले आपले मालकी हक्क २५ हजार डॉलर्सना प्रदीप बक्षी याला विकल्याची माहिती तपास अधिकाराऱ्यांनी कोर्टात दिली.
ADVERTISEMENT
गहना वशिष्ठ आणि उमेश कामत हे दोघंही या App साठी स्क्रिप्ट लिहायचे आणि मेलद्वारे संबंधित व्यक्तींना पाठवायचे ज्यात राज कुंद्राचाही सहभाग होता. याच कारणासाठी पुढील तपासाकरता पोलिसांनी राज कुंद्राची जास्त काळासाठी पोलीस कोठडी मागितली. परंतू राज कुंद्रा यांचे वकील अब्बाद पोंडा यांनी याला विरोध दर्शवला.
Porn Video Case : Raj Kundra नंतर आणखी एका आरोपीला अटक
या प्रकरणात पोलीसांनी राज यांची कस्टडी मागणं हे कायद्याला धरुन नाही. राज यांना अटक न करता पोलीस या प्रकरणाचा तपास का करु शकत नाही हे त्यांनी कोर्टासमोर सांगावं असं पोंडा म्हणाले. राज कुंद्रा यांच्यावर अश्लील व्हिडीओ बनवण्यासंदर्भात जे आरोप ठेवण्यात आले ते चुकीचे असल्याचंही पोंडा यांनी आपल्या युक्तीवादातून सांगण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT