पावसामुळे Kalyan-Dombivali मध्ये रस्त्यांची चाळण, वाहनचालकांची प्रवासादरम्यान अडचण
मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका जसा सामान्य लोकांना बसला तसाच तो रस्त्यांनाही बसला आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यांची चाळण झालेली पहायला मिळते आहे. महापालिका क्षेत्रात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या खड्डयांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हेच खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी […]
ADVERTISEMENT
मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका जसा सामान्य लोकांना बसला तसाच तो रस्त्यांनाही बसला आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यांची चाळण झालेली पहायला मिळते आहे. महापालिका क्षेत्रात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या खड्डयांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हेच खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय. या खर्चावरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा खर्च गरजेपेक्षा जास्त असल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
कल्याण डोंबिवली महापालिका दरवर्षी खड्डे भरण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते. यंदा खड्डे भरण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले आहे. पालिकेकडून पावसाळ्य़ापूर्वी खड्डे भरण्याचे काम दरवर्षी केले जाते. मात्र गेल्या दोन दिवसात कल्याण डोंबिवलीत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
कल्याण मलंग रस्त्यावर एका ठिकाणी भला मोठा खड्डा पडला आहे. त्याची लांबी रुंदी जवळपास चार फूट इतकी आहे. हा खड्डा वाचविताना रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
हे वाचलं का?
महापालिकेने हा रस्ता जवळपास 45 कोटी रुपये खर्च करुन तयार केला आहे. या खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. मे महिन्यात पावसाळा सुरु होण्यापूर्वीच त्यांनी रस्त्याच्या स्थितीबाबत पुन्हा स्मरण पत्र देत याकडे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही असा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
Monsoon Update : आज पुन्हा जोरदार पावसाचा IMD चा इशारा, मुंबईसह नजिकच्या परिसरात पावसाच्या सरी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT