PM Narendra Modi on Chhaava Movie : दिल्लीतही छावाची हवा... पंतप्रधान मोदींकडून उल्लेख, म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छावा चित्रपटाची यशाच्या शिखराकडे वाटचाल

कोट्यवधींची कमाई, अभिनयाचंही कौतुक

पंतप्रधान मोदींकडूनही 'छावा'चा उल्लेख
मराठी मातीचा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपटानं देशात 225 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात हा आकडा 300 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. जगभरात या चित्रपटाचं कौतुक सुरू असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चित्रपटाचं कौतुक केलंय. त्यानंतर विकी कौशलने पंतप्रधान मोदींचे आभार मानले. चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत असल्यानं विकी कौशल आनंदात आहे.
हे ही वाचा >> Raj Thackeray यांच्या भेटीसाठी उदय सामंत 'शिवतीर्थ'वर, महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हालचाली?
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून झालेल्या कौतुकानंतर विकीने इन्स्टाग्रामवर त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्याचा व्हिडीओ शेअर करत विकी म्हणाला “शब्दांच्या पलीकडचा सन्मान!” आहे.
मॅडॉक फिल्म्सनेही पंतप्रधान मोदींचे आभार मानले. इंस्टाग्रामवरील पोस्टसोबत त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, "ऐतिहासिक सन्मान! पंतप्रधान मोदी यांनी 'छावा'चं कौतुक केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आणि वारशाचा उल्लेख केला हा अभिमानाचा क्षण आहे. यामुळे आपण भारावून गेलो. मॅडॉक फिल्म्स, दिनेश विजन, लक्ष्मण उतेकर, विकी कौशल आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या कौतुकाने भारावून गेली आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं. या चित्रपटाबद्दल देशभरात सुरू असलेल्या चर्चेवर पंतप्रधान म्हणाले, "सध्या 'छावा' हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला आहे."
हे ही वाचा >>Suresh Dhas मस्साजोगमध्ये, धनंजय देशमुख म्हणाले पोलिसांनी हात झटकले, आरोपी त्यांचा मित्र...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन उंची दिली आहे. सध्या 'छावा' हा चित्रपट चांगलाच प्रसिद्ध झालाय. शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीत संभाजी महाराजांचं शौर्य या स्वरूपात सादर केलंय."