Trending : सायनाईडपेक्षा 1200 पट विषारी मासा; खाल्ल्यानंतर महिलेला गमवावा लागला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

An 83-year-old woman died after eating puffer fish in Malaysia
An 83-year-old woman died after eating puffer fish in Malaysia
social share
google news

मलेशियामध्ये पफर नावाचा मासा (Puffer fish) खाल्ल्याने एका 83 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या महिलेच्या पतीची तब्येतही अत्यावस्थ असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा मासा तयार करताना यातील विषारी भाग काढून न टाकल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. (An 83-year-old woman died after eating puffer fish in Malaysia)

ADVERTISEMENT

दरम्यान, NYT च्या रिपोर्टनुसार, मृत महिलेच्या मुलीने सांगितले की, तिच्या पालकांनी स्थानिक दुकानातून पफर मासा विकत घेतला होता. तो खाल्ल्यानंतर लगेचच आईला उलट्या होऊ लागल्या. काही वेळातच वडिलांची प्रकृतीही ढासळू लागली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले. तर वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते कोमात गेले आहेत.

हेही वाचा : VIDEO : कपडे धुवायला टाकले…अन् अचानक झाला वॉशिंग मशिनचा स्फोट

पफर माशाशी संबंधित या घटनेबाबत बोलताना अन्न आणि औषध विभागाने सांगितले की, पफर माशांमध्ये टेट्रोडोटॉक्सिन आणि सॅक्सिटॉक्सिन हे घातक विष आढळले आहे. हे विषारी विष शिजवून आणि गोठवूनही नष्ट होऊ शकत नाही. मात्र, जपानमध्ये या माशापासून बनवलेली डिश मोठ्या थाटामाटात खाल्ली जाते, पण ती फक्त कुशल शेफ बनवतात. कारण, त्यांना या माशातून विष काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

हे वाचलं का?

हेही वाचा : Video: दिल्लीच्या मेट्रोत शिरली बिकनी गर्ल, अन् प्रवाशांची उडाली तारांबळ

तज्ज्ञांच्या मते पफर फिश अत्यंत विषारी असून त्याच्या अनेक प्रजाती आहेत. या माशात घातक विष असते. त्यांचे विष सायनाइडपेक्षा 1200 पट जास्त विषारी असते. हे मुख्यतः जपान, चीन, दक्षिण आफ्रिका, फिलीपिन्स आणि मेक्सिको सारख्या देशांमध्ये आढळतात. पफर फिशला ब्लोफिश असेही म्हणतात. तो दिसायला चेंडूसारखा गोल असतो. त्वचा काट्याने झाकलेली असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT