पुणे: रस्त्याच्या कडेला पडलेल्या वायरचा शॉक बसून 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: क्लासवरून घरी चाललेल्या चार वर्षाच्या मुलाचा रस्त्याच्या कडेला पडलेल्या वायरचा शॉक बसून जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

शहनाज अमीर सय्यद (वय 4 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असल्याचे समजते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील स्पार्क मिठानगर नवजीवन पार्क गल्ली नंबर 10 परिसरात शहनाज अमीर सय्यद हा चार वर्षाचा मुलगा राहत होता.

शहनाज हा क्लास संपल्यानंतर घरी जात असताना जवळच पावसाळी लाईनचे काम चालू सुरू होते. यामुळे रस्ता खोदलेला होता. तर त्याच रस्त्याच्या कडेला एक वीज वाहून नेणारी हाय वोल्टजे वायर कट झाली होती. त्याच वायरच्या शेजारून जात असताना वायरचा जोरदार झटका शहनाज अमीर सय्यद याला बसला.

हे वाचलं का?

हा झटका एवढा भयंकर होता की, शहनाज हा त्याच क्षणी खाली कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ नजीकच्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तसेच आता या प्रकरणी तपास करुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही शहनाजच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, आता याच प्रकरणी कोंढवा पोलीस हे अधिक तपास करत आहेत.

माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेंच्या कॉलेजमध्ये विजेचा शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

ADVERTISEMENT

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी राज्यमंत्री आणि भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्या अमरावती येथील पोटे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये चार कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. कॉलेजच्या गेटला कलर करण्याचं काम सुरु असताना शॉक लागल्याने चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

ADVERTISEMENT

शाळेत ध्वजारोहणावेळी शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण जखमी

अक्षय सावरकर (वय 26), प्रशांत शेलोरकर (वय 31), संजय दंडनाईक (वय 45), गोकुळ वाघ (वय 29) अशी या मृत कर्मचाऱ्यांची नावं आहेत. हे चौघे याच कॉलेजमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार कॉलेज प्रशासनाने मुख्य गेटला रंगरंगोटीचं काम हाती घेतलं होतं.

या कामासाठी बाहेरुन माणसं न बोलावता कॉलेज प्रशासनाने कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनाच रंगरंगोटीचं काम करायला सांगितलं होतं. ज्यानुसार हे चारही शिपाई रंग देण्याचं काम करत होते. लोखंडी शिडीवर चढून गेटला रंग देण्याचं काम करत असताना वरुन जाणाऱ्या विजेच्या तारेचा धक्का लागल्यामुळे चारही कामगार जमिनीवर कोसळले. ज्यात तिघांचा जागेवरच तर एका कर्मचाऱ्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT