Pune bandh : भगतसिंह कोश्यारींविरुद्ध ‘मूक मोर्चा’तून एल्गार, पुण्यात काय सुरूये?
Pune band updates : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने राज्यभर जनक्षोभ उमटताना दिसत आहे. राज्यपालांविरोधात आज पुणे बंदची हाक देण्यात आली असून, यापार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुणे शहरातील डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चाला सुरुवात होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे […]
ADVERTISEMENT
Pune band updates : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने राज्यभर जनक्षोभ उमटताना दिसत आहे. राज्यपालांविरोधात आज पुणे बंदची हाक देण्यात आली असून, यापार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुणे शहरातील डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चाला सुरुवात होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहालपर्यंत हा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या काळात बाजारपेठेतील सर्व दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहर पोलीस दल, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखा पथकेही तैनात करण्यात आलेली आहेत.
हे वाचलं का?
पुण्यात निघणाऱ्या मूक मोर्चाच्या मार्गावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं देखील लक्ष असणार आहे. गोंधळ वा कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांकडून हा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
पुणे बंदमध्ये कोण कोण होणार सहभागी?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात काढण्यात येणाऱ्या या मोर्चात छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे हे नेते सहभागी होणार आहेत.
ADVERTISEMENT
पुण्यात रिक्षा चालकांचं आंदोलन चिघळलं; दंगल नियंत्रण पथक दाखल : काय घडलं?
ADVERTISEMENT
मोर्चानंतर जाहीर सभा होणार असून, या सभेत या नेत्यांची भाषणंही होणार आहेत. या मोर्चात विविध राजकीय पक्ष, संघटनांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यासोबतच पुण्यातील 36 गणेशोत्सव मंडळांनीदेखील या बंदला पाठिंबा दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT