पत्नी बेडवर यायला नाही म्हणाली, पतीची सटकली... उसाच्या शेतात गेला अन्...
पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीला तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या
हत्येनंतर पतीने पत्नीचा मृतदेह ऊसाच्या शेतात दिला फेकून
हत्येनंतर पतीने पत्नीचा मृतदेह ऊसाच्या शेतात दिला फेकून
बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यातील हिरूर गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. या घटनेने संपूर्ण परिसर एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पण त्याच्या अटकेनंतर त्याने पोलिसांना पत्नीच्या हत्येचं जे कारण सांगितलं त्यावरून पोलीस हादरून गेले आहेत.
'त्या' नाजूक गोष्टीवरून पती-पत्नीमध्ये भांडण आणि...
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये यापूर्वी देखील अनेकदा भांडणं व्हायची. पण यावेळी भांडण इतकं वाढले की, पतीने टोकाचं पाऊल उचलत थेट पत्नीची हत्याच केली. पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता, त्यामुळे संतापलेल्या पतीने तिची हत्या केली. ही घटना 25 मे रोजीची असल्याचे समजतं आहे.
हे ही वाचा>> सैराट.. आईने पोटच्या पोरीचं मुंडकं छाटलं, भावांनी धड केलं वेगळं अन्..
ऊसाच्या शेतात सापडला महिलेचा मृतदेह
दरम्यान, पत्नी गायब झाल्यावर तिच्या पालकांनी पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. तेव्हाच त्यांना एक मृतदेह उसाच्या शेतात आढळला.
एका शेतात पाणी घालत असताना शेताच्या मालकाला महिलेचा मृतदेह आढळून आला. ज्यानंतर त्याने तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून या खून प्रकरणात तपास सुरू केला.










