पत्नी चिडली अन् वाट लागली.. रात्री अडीच वाजता पतीच्या तोंडावर फेकली 'ती' गोष्ट, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही!
Husband And Wife Shocking Viral News : ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादविवादामुळे एका महिलेनं तिच्या पतीच्या अंगावर उकळतं तेल फेकलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कल्याणमध्ये पत्नीने पतीला जाळलं..

घरगुती वादामुळे पत्नीने पतीवर काढला राग

पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात केला गुन्हा दाखल
Husband And Wife Shocking Viral News : ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादविवादामुळे एका महिलेनं तिच्या पतीच्या अंगावर उकळतं तेल फेकलं. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
रात्री पत्नीने नवऱ्यासोबत केला भयंकर कृत्य..नंतर काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात बुधवारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी झालेला व्यक्ती ऑटो रिक्षा चालक असून तो 48 वर्षांचा आहे. इमरान अब्दुल गफ्फार शेख असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. शेखचं घरगुती कारणावरून पत्नीसोबत भांडण झालं होतं.
हे ही वाचा >> हनिमूनला गेलेल्या कपलसोबत काय घडलं, पतीची हत्या.. पत्नी बेपत्ता; ही मर्डर मिस्ट्री तुमचं डोकंच टाकेल चक्रावून!
दोघांमध्ये वाद इतका वाढला की, महिलेनं रागाच्या भरात गरम तेल इमरानच्या अंगावर फेकलं. गरम तेल टाकल्याने इमरानचं डोकं, चेहरा, डोळे आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी माहिती दिली की, गरम तेलाने भाजलेल्या इमरानला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
इमरानची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला. पोलिसांनी साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यासही सुरुवात केली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, प्राथमिक तपासात हा घरगुती वाद असल्याचं समोर आलंय. जस जसं तपास पुढे जाईल, त्या आधारावर कारवाई केली जाईल.