पुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान होणार जमीनदोस्त,जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्ली येथील twin टॉवर ही इमारत 12 सेकंदात ईडीफाईस कंपनीने पाडली होती.ती इमारत पडतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.आता हीच कंपनी पुण्यातील चांदणी चौकातील पूल (आज) रविवारी मध्यरात्री 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास पाडण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली.

ADVERTISEMENT

जिल्हाधिकाऱ्यांनी काय माहिती दिली?

या बाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले की,हा पूल पाडण्यापूर्वी 200 मीटरचा परिसर सायंकाळी 6 वाजल्यापासून निर्मनुष्य करण्यास सुरुवात करीत आहोत. हा पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये. त्या दृष्टीने 6 हजार 500 मीटर चॅनल लिंक्स, 7 हजार 500 वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, 500 वाळूच्या पिशव्या आणि 800 वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

पूल पाडण्यासाठी योग्य मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आणखी माहिती देत सांगितलं की, पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. 16 एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

पूल परिसरात कलम १४४ लागू

राजेश देशमुख यांनी दिलेल्वाया माहितीनुसार वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण 3 पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 46 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 355 पोलीस कर्मचारी असे एकूण 427 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

हा पूल पाडण्यासाठी तब्बल ६०० किलो स्फोटकं वापरण्यात येणार आहेत. ही स्फोटकं भरण्याचंही काम झालं आहे. रात्री १ ते २ च्या दरम्यान पूर्ण तयारीनिशी हा पूल पाडण्यात येईल. अवघ्या काही सेकंदात हा पूल जमीनदोस्त होणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूकही काही तास बंद राहणार आहे.

ADVERTISEMENT

वाहतुकीतील बदल-

ADVERTISEMENT

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे.

साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात येणार आहे.

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहिल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT