काँग्रेसला झटका! कॅप्टन अमरिंदर सिंग मांडणार वेगळी चूल; भाजपसह इतर पक्षांना घेणार सोबत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाबच्या राजकारणात मंगळवारी सायंकाळी आणखी एक भूकंप झाला. या राजकीय भूकंपाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग नवीन पक्ष स्थापन करणार असून, त्यांनी मंगळवारी याबद्दलची घोषणा केली.

ADVERTISEMENT

नवज्योत सिंग सिद्धू गटामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेसला राम राम ठोकला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा करत काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्वीट करत पंजाबसह देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. रवीन ठुकराल यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती ट्वीट करून दिली.

हे वाचलं का?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा हवाला देत त्यांनी एक ट्वीट केलं. ज्यात म्हटलेलं आहे की, ‘पंजाबच्या भविष्याची लढाई सुरू आहे. मी लवकरच स्वतःच्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार आहे. हा पक्ष पंजाबमधील लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल, जे मागील एका वर्षापासून संघर्ष करत आहेत’, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

भाजपकडे मैत्रीचा हात…

ADVERTISEMENT

नवीन पक्ष स्थापनेची घोषणा करतानाच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भविष्यातील पंजाब विधानसभा निवडणुकीत कुणासोबत आघाडी करणार याबद्दलचं चित्रही स्पष्ट केलं आहे. ‘2022च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत जागा वाटपाची आशा आहे; पण जर भाजप आंदोलक शेतकऱ्यांचं समाधान करणार असेल तर. त्याचबरोबर समविचारी पक्षांना जसं अकाली गटातील ढींडसा आणि ब्रह्मपुरा गटासोबत आघाडी करण्याबद्दल चाचपणी करू’, असंही कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

‘…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही’

‘माझ्या माणसांचं आणि पंजाबचं भविष्य जोपर्यंत सुरक्षित होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. पंजाब राजकीय स्थिरता आणि अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून सुरक्षा गरजेची आहे. मी माझ्या लोकांना वचन देतो की पंजाबची शांतता आणि सुरक्षा आज धोक्यात असून या शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व मी करेन’, असंही कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT