शेतकरी आंदोलनाचा भाजपला जोरदार झटका, पंजाबमध्ये काँग्रेसचे जय हो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्ली-हरयाणाच्या बॉर्डरवर गेल्या ३ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारने आणलेले ३ कृषी कायदे मागे घेण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनावर अजून कुठला तोडगा निघताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांबदद्ल केंद्र सरकारबद्दल सर्वाधिक रोष असलेल्या पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक झाली.

ADVERTISEMENT

आजच्या निकालात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय. तर कृषी कायद्यावरून एनडीएची साथ सोडणाऱ्या शिरोमणी अकाली दलासोबतच भाजपलाही मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागतंय.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयाला आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीलाही पराभवाचं तोंड बघावं लागतंय.

हे वाचलं का?

जवळपास सगळ्याच पालिकांमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय, तर काही ठिकाणी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळालीय. आतापर्यंत लागलेल्या निकालातून शेतकरी आंदोलनाचा प्रभाव स्पष्ट झालाय.

आतापर्यंत आलेला निकाल पुढीलप्रमाणे-

ADVERTISEMENT

बाटला नगरपालिका- काँग्रेस 35, अकाली दल 6, भाजप 4, आप 3, अपक्ष 1

ADVERTISEMENT

मोगा नगरपालिका – काँग्रेस 20, अकाली दल 15, भाजप 1, आप 4, अपक्ष 10

कपूरथला नगरपालिका – काँग्रेस 43, अकाली दल 3, अपक्ष 2

पठाणकोट नगरपालिका – काँग्रेस 37, अकाली दल 1, भाजप 11, अपक्ष 1

अबोहर नगरपालिका- काँग्रेस 49, अकाली दल 1

अमृतसर जिल्ह्याचा निकाल

रमदास
काँग्रेस 8
अकाली दल 3

मजीठा
काँग्रेस 2
अकाली दल 10
अपक्ष 1

रइया
काँग्रेस 12
अकाली दल 1

अजनाला
काँग्रेस 7
अकाली दल 8

जंदियाला
काँग्रेस 19
अकाली दल 3
अपक्ष 2

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. एकूण ११७ पालिकांसाठी ९ हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण आतापर्यंत जे निकाल हाती आलेत, त्यात भाजपला मोठा फटका बसल्याचं दिसतंय.

८ महापालिका आणि १०० हून जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी २,३०२ वॉर्डात निवडणूक झाली. गेल्या १४ फेब्रुवारीला यासाठी मतदान पार पडलं. ७० टक्क्याहून जास्त एवढ्या विक्रमी मतदानाची नोंद झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सत्ताधारी काँग्रेसनं २,०३७, तर विरोधी पक्षातल्या शिरोमणी अकाली दलानं १,५९६ जागांवर उमेदवार दिले. भाजपने १,००३, आम आदमी पार्टीने १६,०६ आणि बसपाने १६० जागांवर उमेदवार दिले होते. कृषी कायद्यामुळे शिरोमणी अकाली दलाने एनडीएपासून फारकत घेतल्याने भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT