‘आपल्याला कुणीही रोखू शकत नाही’; मुसळधार पावसात राहुल गांधींचं भाषण, व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या कर्नाटकातील आजच्या सभेचा व्हिडीओ बघून महाराष्ट्रातल्या नागरिकांना २०१९ मधील शरद पवारांच्या सभेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या कर्नाटकात दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा राहुल गांधींचा पावसातल्या सभेतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

ADVERTISEMENT

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या भाजपशासित कर्नाटकात आहे. भारत जोडो यात्रेचा कर्नाटकातला हा तिसरा दिवस आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी नंजनगुडमधल्या प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

त्यानंतर राहुल गांधींनी मैसूरमधील एपीएमसी मैदानावर एका सभेला संबोधित केलं. राहुल गांधी यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पाऊस कोसळत असताना राहुल गांधींनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.

हे वाचलं का?

राहुल गांधी यांच्या पावसातल्या या सभेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच इतरांकडूनही हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

ADVERTISEMENT

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कर्नाटकात, भाजप-आरएसएसवर टीकास्त्र

भरपावसात झालेल्या या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र डागलं. राहुल गांधी म्हणाले, “भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहोचलीये. नदीप्रमाणे ही यात्रा कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत चालेल. या नदीत तुम्हाला हिंसा, द्वेष दिसणार नाही. फक्त प्रेम दिसेल आणि बंधूभाव दिसेल. ही यात्रा थांबणार नाही. आता बघा पाऊस येतोय. पावसालाही यात्रा रोखता आलेली नाहीये. भाजप-आरएसएसने जो द्वेष देशात भरला आहे, त्याविरोधात ही यात्रा आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या साताऱ्यातल्या सभेची चर्चा

राहुल गांधी यांच्या कर्नाटकातल्या पावसातल्या सभेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या सभेची चर्चा सुरू पुन्हा सुरू झालीये. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या साताऱ्यातल्या पावसातील सभेनं निवडणुकीचं चित्रच बदललं होतं. या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत आणि सातारा लोकसभा मतदारसंघात यश मिळालं होतं. राहुल गांधी यांच्या सभेची तुलना आता सभेशी होऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT