Porn Films case : वेडं बनून पेढा खाणं यालाच म्हणतात; शिल्पा शेट्टीला शर्लिनने सुनावलं
पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून, त्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात शिल्पा शेट्टी नोंदवलेला जबाब असून, आपल्याला राज कुंद्राच्या व्यवसायाविषयीही माहिती नव्हती, असं शिल्पाने म्हटलं आहे. त्यावरून अभिनेत्री व मॉडेल शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टीला सुनावलं आहे. पॉर्न चित्रपट बनवून ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज करणाऱ्या एका रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला […]
ADVERTISEMENT
पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून, त्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात शिल्पा शेट्टी नोंदवलेला जबाब असून, आपल्याला राज कुंद्राच्या व्यवसायाविषयीही माहिती नव्हती, असं शिल्पाने म्हटलं आहे. त्यावरून अभिनेत्री व मॉडेल शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टीला सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
पॉर्न चित्रपट बनवून ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिलीज करणाऱ्या एका रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणाचे धागेदोर थेट उद्योगपती राज कुंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. राज कुंद्रा सूत्रधार असून तसे पुरावे असल्याचं पोलिसांनी अटकेनंतर स्पष्ट केलं होतं.
राज कुंद्राच्या अटकेनंतर पोलिसांनी शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला होता. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर शिल्पाचं म्हणणं समोर आलं आहे. त्यावरून आता शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टीला सुनावलं आहे.
हे वाचलं का?
शर्लिन चोप्राने ट्विटरवर एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात तिने शिल्पा शेट्टीने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
Pornography Case : शिल्पा शेट्टीने पोलिसांना सांगितलं ‘राज काय करतो ते मला….’
ADVERTISEMENT
काय म्हणाली शर्लिन चोप्रा?
ADVERTISEMENT
‘माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार दीदीचं (शिल्पा शेट्टी) असं म्हणणं आहे की, तिला तिच्या पतीदेवाच्या या व्यवसायाबद्दल कसलीही माहिती नव्हती. इतकंच नाही, तर दीदीचं असंही म्हणणं आहे की, तिच्या पतीदेवाच्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या स्त्रोताबद्दलही माहिती नव्हती. आता ही गोष्ट किती खरी आहे, याचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता. असो, पण वेडं बनून पेढा खाणं यालाच म्हणतात ना?
येडा बनके पेड़ा खाना.. pic.twitter.com/PIRDhihAHQ
— Sherlyn Chopra (@SherlynChopra) September 16, 2021
शिल्पा शेट्टीचं म्हणणं काय?
‘राज कुंद्राने 2015 मध्ये विआन इंडस्ट्रीज लि. नावाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीत त्याचे 24.50 टक्के शेअर्स आहेत. सदर कंपनीमध्ये एप्रिल 2015 ते जुलै 2020 या कालावधीत मी संचालक पदावर होते. मात्र नंतर मी या पदाचा राजीनामा दिला. हॉटशॉट अॅप आणि बॉलीफेम या संदर्भात मला काहीही माहित नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने राज कुंद्रा नेमकं काय करत होता, हे माहित नाही’, असं शिल्पा शेट्टीने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT