Raj Thackeray Sabha: राज ठाकरेंची सभा उधळण्याची धमकी कोणी दिली?
मुंबई: औरंगाबादमध्ये आज (1 मे) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, ही सभा उधळून लावण्याची भूमिका भीम आर्मीने घेतली आहे. पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या 16 अटींचं उल्लंघन राज ठाकरे यांनी केलं तर महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊन सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल […]
ADVERTISEMENT

मुंबई: औरंगाबादमध्ये आज (1 मे) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, ही सभा उधळून लावण्याची भूमिका भीम आर्मीने घेतली आहे. पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या 16 अटींचं उल्लंघन राज ठाकरे यांनी केलं तर महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊन सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता.
आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होत असून राज ठाकरेंना भारतीय संविधान भेट देणार असल्याचं भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी म्हटलं होतं.
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
औरंगाबाद येथील राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता, मात्र त्याअगोदरच मुंबई पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून औरंगाबादच्या दिशेने निघालेले भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घाटकोपर चिरागनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.










