राजन शिंदे हत्या : डंबेल, चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल सापडला; अल्पवयीन आरोपीला अटक
राज्याची पर्यटन राजधानी असलेलं औरंगाबाद 11 ऑक्टोबर रोजी खूनाच्या घटनेनं हादरलं. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या राजन शिंदे यांची राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्या कुणी आणि कशामुळे केली? याचा छडा लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून मागील आठ दिवसांपासून सुरू होते. अखेर त्याला यश मिळालं असून, एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. […]
ADVERTISEMENT
राज्याची पर्यटन राजधानी असलेलं औरंगाबाद 11 ऑक्टोबर रोजी खूनाच्या घटनेनं हादरलं. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या राजन शिंदे यांची राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्या कुणी आणि कशामुळे केली? याचा छडा लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून मागील आठ दिवसांपासून सुरू होते. अखेर त्याला यश मिळालं असून, एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हत्येसाठी वापरण्यात आल्या गोष्टी पोलिसांना सापडल्या आहेत.
ADVERTISEMENT
प्रा. राजन शिंदे यांची 11 ऑक्टोबर रोजी डोक्यावर वार केल्यानंतर गळा व हाताच्या नसा कापून हत्या करण्यात आली होती. राजन शिंदे यांच्या हत्येनं शहरात खळबळ उडाली होती. मात्र, राजन शिंदे यांच्या हत्येनंतर कुणी व का हत्या केली असेल, यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
मागील एका आठवड्यापासून पुराव्यांचा आणि आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. प्रकरणाचं गांभीर्य ओळखत पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी या घटनेचा तपास स्वतःकडे घेतला होता. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे गोळा करण्याबरोबर आरोपींच्या शोधासाठी विविध पथक तयार केली होती.
हे वाचलं का?
विहिरीतून 45 फूट पाण्याचा उपसा
ADVERTISEMENT
प्रकरणाचा तपास सुरू असताना राजन शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत पुरावे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. पोलिसांनी 16 ऑक्टोबरला विहिरीतील पाणी उपसण्यास सुरूवात केली. यासाठी महापालिकेची मदत घेण्यात आली. चार पंपाद्वारे 45 फूट पाण्याचा उपसा करण्यात आला.
ADVERTISEMENT
तीन दिवसांनंतर विहिरीतील पाणी आणि गाळ काढल्यानंतर पोलिसांना पुरावे बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. पोलिसांना विहिरीत पाच किलो वजनाचं डंबेल, एक धारदार चाकू आणि रक्त पुसलेला टॉवेल सापडला आहे. खुनासाठी वापरण्यात आलेलं साहित्य सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.
औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक राजन शिंदे यांची गळा चिरून हत्या
पोलिसांनी पुरावे ताब्यात घेत आरोपीला अटक केली असली, तरी खुनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. डॉ. राजन शिंदे यांच्या डोक्यात आधी डंबेल मारण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या गळा आणि हाताच्या नसा कापण्यात आल्या, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासावरून काढला आहे. आरोपीच्या चौकशीनंतर हत्येचं कारण समोर येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT