बलात्कार पीडितेचं जगणं झालंय मुश्कील, ‘तो’ Video व्हायरल झाल्याने 5 वर्षापासून पीडिता घरातच
मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर: पाच वर्षापूर्वी झालेल्या बलात्काराने एक पीडित मुलगी इतकी भेदरलेली आहे की तिने घराच्या बाहेर जाणंच बंद केलं आहे. धक्कादायक म्हणजे, अत्याचार करतानाचा व्हीडिओ आरोपीने व्हायरल केल्याने अनेक ओळखीच्या लोकांकडे हा व्हीडिओ पोहचला आहे. यामुळेच पीडित मुलीने बाहेर जाणं बंद केलं आहे. व्हायरल व्हीडिओमुळे पीडित मुलीच्या मागे टवाळ मुलं लागतात. लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर: पाच वर्षापूर्वी झालेल्या बलात्काराने एक पीडित मुलगी इतकी भेदरलेली आहे की तिने घराच्या बाहेर जाणंच बंद केलं आहे. धक्कादायक म्हणजे, अत्याचार करतानाचा व्हीडिओ आरोपीने व्हायरल केल्याने अनेक ओळखीच्या लोकांकडे हा व्हीडिओ पोहचला आहे. यामुळेच पीडित मुलीने बाहेर जाणं बंद केलं आहे.
ADVERTISEMENT
व्हायरल व्हीडिओमुळे पीडित मुलीच्या मागे टवाळ मुलं लागतात. लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अखेर घराबाहेर टोमणे आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने गेली पाच वर्षे ही मुलगी घराबाहेरच पडली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अंबरनाथ मध्ये राहणारी या 17 वर्षीय अल्पवयीन पीडिता ही आरोपी अजमल याच्या जीन्स पॅकिंग कंपनीत कामाला होती. मात्र, त्याच्याकडील काम सोडून पीडिता दुसऱ्या कंपनीत कामाला जाऊ लागली होती. याचाच राग मनात धरुन आरोपीने बदलापूर कोंडेश्वर भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला हातो. यावेळी आरोपी अजमल मलिक याने अत्याचार करतानाचा व्हिडिओ मोबाइलमध्ये शूट केला होता.
हे वाचलं का?
तसेच हा व्हीडिओ दाखवून तुझी बदनामी करेन असे धमकी दिल्याने पीडितेने आपल्यावरील अत्याचाराची माहिती घरच्यांना दिली नव्हती. मात्र, काही दिवसांनी तिचा हा व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले. अखेर पीडितेने घरच्यांना याची माहिती दिली.
नागपुरातील संतापजनक घटना! तरुणीवर चौघांकडून दोन दिवस सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT
ज्यानंतर उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपी अजमल विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक देखील झाली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. मात्र, या घटनेच्या व्हीडिओमुळे मुलांकडून छेडछाड आणि इतर टोमणे मारत असल्याने पिडीता गेल्या पाच वर्षात अगदी दोन ते तीन वेळाच ती आपल्या आई आणि आजीसोबत बाहेर गेली आहे.
ADVERTISEMENT
पण ती अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही. आता हा व्हीडिओ इंटरनेटवरून डिलीट करून आमचे पुनर्वसन करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडिता आणि तिच्या घरच्यांनी केली आहे.
दरम्यान, आता या घटनेप्रकरणी स्थानिक पोलीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तसंच बलात्कार पीडितेला पुन्हा सामान्य आयुष्य जगता यावं यासाठी समाजाचा देखील दृष्टीकोन बदलण्याची अत्यंत गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT