RBIनं रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना केला रद्द; खातेदारांनी पुढे काय करावं?
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी सांगितले की त्यांनी 12 सप्टेंबर 2017 रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणेचा परवाना रद्द केला आहे. हा आदेश सहा आठवड्यांनंतर लागू होईल. 22 सप्टेंबर 2022 पासून हा आदेश लागू असणार आहे. सेंट्रल बँकेने म्हटले ”रुपी को-ऑपरेटिव्ह बँक (Rupee Co-op Bank […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी सांगितले की त्यांनी 12 सप्टेंबर 2017 रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणेचा परवाना रद्द केला आहे. हा आदेश सहा आठवड्यांनंतर लागू होईल. 22 सप्टेंबर 2022 पासून हा आदेश लागू असणार आहे.
सेंट्रल बँकेने म्हटले ”रुपी को-ऑपरेटिव्ह बँक (Rupee Co-op Bank Ltd.) पुणेला बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर त्याचा विपरित परिणाम झाला असता. सध्याची आर्थिक स्थिती असलेली बँक सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही.”
सहा आठवड्यांनंतर बँक व्यवसाय करणे थांबवेल
आरबीआयने म्हटले आहे की रुपी बँक आजपासून सहा आठवड्यांनंतर बँकिंग व्यवसाय करणे थांबवेल. या बँकेला ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई केली जाईल ज्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे समाविष्ट असेल.
बँकिंग नियामक संस्थेने सांगितले की, सहकार आयुक्त आणि महाराष्ट्राचे सहकारी संस्थांचे निबंधक यांना बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे.