Remdesivir ही कोरोनाच्या उपचार पद्धतीच्या यादीतून बाद होणार?
Remdesivir चा काळाबाजार, Remdesivir चा भासणारा तुटवडा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने अनुभवल्या. त्यावरून देशभरात झालेलं राजकारणही पाहिलं. मात्र आता हेच Remdesivir इंजेक्शन कोरोना उपचारांच्या यादीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णांवर केल्या जाणारी प्लाझ्मा थेरेपी केंद्र सरकारने उपचारांच्या यादीतून वगळली. त्या पाठोपाठ आता रेमडेसिवीर हे इंजेक्शनही उपचारांच्या यादीतून वगळलं जाण्याची चिन्हं आहेत. दिल्लीतील सर गंगाराम […]
ADVERTISEMENT

Remdesivir चा काळाबाजार, Remdesivir चा भासणारा तुटवडा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने अनुभवल्या. त्यावरून देशभरात झालेलं राजकारणही पाहिलं. मात्र आता हेच Remdesivir इंजेक्शन कोरोना उपचारांच्या यादीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णांवर केल्या जाणारी प्लाझ्मा थेरेपी केंद्र सरकारने उपचारांच्या यादीतून वगळली. त्या पाठोपाठ आता रेमडेसिवीर हे इंजेक्शनही उपचारांच्या यादीतून वगळलं जाण्याची चिन्हं आहेत. दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी. एस राणा यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
आम्हाला दिवसाला 50 हजार Remdesivir ची गरज, पण मिळतात फक्त.., राजेश टोपेंनी दिली धक्कादायक माहिती
काय म्हणाले आहेत डॉ. राणा?
प्लाझ्मा थेरेपीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णाला कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीज दिल्या जातात. जेणेकरून त्या अँटीबॉडीज संसर्ग झालेल्या विषाणूला संपवतील. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. मात्र प्लाझ्मा दिल्यामुळे रूग्णाच्या तब्बेतीत कोणतीही सुधारणा होत असल्याचं दिसून आलेलं नाही. मागच्या वर्षभरापासून आम्ही हे बघत आहोत. तसंच प्लाझ्मा सहज उपलब्धही होत नाहीये. त्यामुळे ती थेरपी थांबवण्यात आली आहे. अशाच प्रकारचा विचार आम्ही Remdesivir या इंजेक्शनचा विचार करतो आहोत. कोरोना रूग्णांवर उपचारांसाठी वापरलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना रूग्णांवर कोणत्याही प्रकारे सकारात्मक परिणाम करत नाही. त्याचे पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या उपचारांवर करण्यात येणाऱ्या उपचार पद्धतींवरच्या यादीतून हे इंजेक्शन वगळलं जावं याचा विचार आम्ही करतो आहोत.









