नागपूर : बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला, घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूरमधील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिपळा (डाक बंगला) भारात तीन दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. परंतू दुकानमालकाने ऐनवेळी समयसूचकता दाखवत आरडाओरड केल्यामुळे या चोरट्यांना काढता पाय घेणं भाग पडलं. परंतू हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला असल्यामुळे पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

डाकबंगला परिसरात राममिलन सोनी यांचं तुलसी सोनी नावाचं ज्वेलर्सचं दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या दरम्यान राममिलल सोनी आपल्या पत्नीसह दुकानात बसले असताना तीन तरुण दुकानात आले. सुरुवातीला सोनी यांना ते ग्राहक असल्याचं वाटलं. परंतू या तिन्ही तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर सोनी आणि त्यांच्या पत्नी आतल्या खोलीत पळाले.

तिघांपैकी एका दुकानाचं शटर बंद केल्यानंतर दोघांनी आपली बंदुक सोनी यांच्या दिशेने रोखून माल चोरण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यंत सोनी दाम्पत्य सुरक्षितरित्या आतल्या खोलीत गेलं होतं. यावेळी त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केल्यानंतर या तिन्ही दरोडेखोरांनी पळून जाण्यात धन्यता मानली. परंतू या सर्व प्रकारात तिन्ही दरोडेखोरांचे चेहरे दुकानातल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

हे वाचलं का?

या घटनेनंतर खापरखेडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिन्ही आरोपी २० ते २५ वयोगटातले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी, सिल्लेवाडा, चंनकापूर या भागात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. अशातच या घटनेनंतर पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT