विराट, राहुलला इतक्या संधी मिळतात, मग धवनला का नाही?, माजी क्रिकेटर हरभजन सिंह भडकला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Harbhajan Singh Criticize Selectors on Shikhar Dhawan
Harbhajan Singh Criticize Selectors on Shikhar Dhawan
social share
google news

Harbhajan Singh Criticixze Selectors on Shikhar Dhawan : टीम इंडियाचा सलामीवीर आणि पंजाबचा किंग्सचा स्टार खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) आयपीएलमध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. शिखऱ धवनची फलंदाजी पाहून सर्वच अवाक झाले आहे. त्यात एकिकडे शिखर धवनला टीम इंडियाच्या संघातून दुर केले जात असताना त्याचा हा परफॉर्मन्स पाहता सिलेक्टर्सवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जर रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहूल साऱख्या खेळाडूंना इतक्या संध्या मिळतात, मग शिखर धवनला का नाही असा सवाल एका माजी क्रिकेटरने केला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. (rohit sharma virat kohli kl rahul got plenty of chance then why not shikhar dhawan harbhajan singh angree on selectors)

ADVERTISEMENT

आयपीएल मधला परफॉर्मन्स

आयपीएलमध्ये बुधवारी पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्समध्ये (Rajsthan Royals) सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्स 197 धावांचे आव्हान पुर्ण करू शकली नाही आणि पंजाबने 5 धावांनी हा सामना जिंकला होता. या सामन्यात शिखर धवनने (Shikhar Dhawan) 56 बॉलमध्ये 86 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर कोलकत्ता विरूद्धच्या सामन्यात त्याने 29 बॉलमध्ये 40 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या दोन सामन्यातच त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. या त्याच्या खेळीनंतर आजी-माजी क्रिकेटर कौतूक करत आहेत.

माजी क्रिकेटर काय म्हणाला?

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून शिखर धवन टीम इंडियाच्या संघातून दुर झाला आहे. टीम इंडियाच्या संघात नवख्या खेळाडूला संधी दिली जात आहे. हे नवखे खेळाडू स्वत:ला चांगल्या प्रकारे सिद्ध देखील करत आहेत. त्यामुळे शिखर धवनची जागा नवोदीत खेळाडूंनी घेतली आहे. त्यामुळे संघात शिखर धवन सोबत होत असलेल्या या प्रकारावर प्रथमच माजी क्रिकेटर हरभजन सिंहने (Harbhajan Singh) मोठे विधान करत सिलेक्टर्सना सुनावले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : टीम इंडियाच्या ‘गब्बर’ला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार?

शिखर धवनने अनेक दौऱ्यात टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली आहे. परंतू अचानक त्याला संघातून दूर केले जात आहे. जशी त्याची आता संघाला गरजच नाही आहे. मला हे पाहून खुप वाईट वाटतेय. कारण संघात सर्व खेळाडूंना बरोबरीचा दर्जा मिळाला पाहिजे, असे मत हरभजन सिंहने (Harbhajan Singh) हिंदुस्तान टाईम्सच्या न्युज चॅनेलवर मांडले आहे.

शिखर धवन हा मोठा खेळाडू आहे, त्याने संघासाठी खुप चांगली कामगिरी केली आहे. तुम्ही त्याच्याशी असे वागू शकत नाही, अशा शब्दात हरभजन सिंहने सिलेक्टर्सना सुनावले आहे.मी इथे कोणाचे नाव घेणार नाही. पण रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहूल सारख्या खेळाडूंना खुप संधी मिळाल्या आहेत. मग शिखर धवनला का नाही? धवनला संघात जागा का नाही? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. जर फिटनेस बद्दल बोलायचं झालं तर तो विराट कोहलीसारखाच फिट आहे, असे देखील हरभजन (Harbhajan Singh)म्हणालाय.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : वडील कारगिल युद्धात लढले, मुलाने IPLमध्ये दाखवला दम; कोण आहे ध्रुव जुरेल?

दरम्यान आता हरभजनने (Harbhajan Singh) कान टोचल्यानंतर आणि शिखर धवनच्या आयपीएलमधील उत्कृष्ट खेळीनंतर त्याला संघात संधी मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT