Indian primer league 2023 : IPL च्या 16 व्या मोसमात अजूनही IPL विजेतेपदापासून दूर असलेल्या पंजाब किंग्जने धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबने दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पाच धावांनी पराभव केला. एकेकाळी पंजाबचा संघ मोठा विजय मिळवेल असे वाटत असले तरी पण राजस्थान रॉयल्सच्या शिमरॉन हेटमायर आणि 22 वर्षीय ध्रुव जुरेलने शेवटी फलंदाजी करत पंजाबला अडचणीत आणलं होतं. (Father fought in Kargil war, son showed courage in IPL; Who is Dhruva Jurel?)
CSK, IPL; ‘…नाहीतर कर्णधारपदच सोडून देईन’, एमएस धोनीचा गोलंदाजांना इशारा
198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जुरेल 15 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 32 धावा करून संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गुवाहाटीच्या मैदानात जुरेलची बॅट चालली आणि राजस्थानला 22 वर्षीय फलंदाज मिळाला ज्याच्याकडे सामना संपवण्याची क्षमताही आहे, अशी चर्चा सुरु झाली.
Jurel आणि Hetmyer कडून जोरदार प्रयत्न
198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाने 15 षटकात 6 गडी गमावून 124 धावा केल्या होत्या. यानंतर ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर या जोडीने स्कोरकार्ड फिरवण्याचा निर्णय घेतला. प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेल्या जुरेलने सामन्यात आपल्या फलंदाजीने प्रभाव पाडला. हेटमायर आणि जुरेल यांच्यात 7व्या विकेटसाठी जलद 62 धावांची भागीदारी झाली. पण त्यानंतरच हेटमायरने अखेरच्या षटकात 18 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांसह 36 धावा केल्या.तर जुरेल एका टोकाला थांबला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 16 धावांची गरज होती. पण आयपीएलचा सर्वात महागडा गोलंदाज सॅम करनने हे होऊ दिले नाही. त्याच्या तगड्या गोलंदाजीसमोर राजस्थानचा संघ लक्ष्यापासून 5 धावा दूर राहिला आणि 192 धावाच करू शकला.
IPL 2023 : चरणस्पर्श! धोनी समोर येताच अरिजीत सिंग पडला पाया, चाहत्यांची जिंकली मनं
धोनीचा चाहता आहे जुरेल
अशाप्रकारे कठीण प्रसंगी जुरेलने आघाडी घेत 32 धावांच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार खेचले. राजस्थानचा पराभव होऊनही सर्वजण जुरेलच्या फलंदाजीबद्दल बोलत होते. जुरेलबद्दल सांगायचे तर तो 2020 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून जुरेल चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो. ध्रुवने 19 वर्षांखालील विश्वचषकात यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंसोबत चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने 2022 च्या लिलावामध्ये 20 लाखांच्या मूळ किमतीत त्याचा समावेश केला.
आग्राचा राहणारा आहे ध्रुव
जुरेल हा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील असून त्याचे वडील नेम सिंग जुरेल यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे आणि 1999 च्या कारगिल युद्धात भाग घेतला आहे. सुरुवातीला ध्रुवचीही भारतीय लष्करात भरती होण्याची इच्छा होती. पण क्रिकेटच्या आवडीमुळे तो सैन्यात भरती होऊ शकला नाही. जर ध्रुव आयपीएल 2023 च्या मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी त्याच्या बॅटने चांगला खेळला तर भविष्यात तो टीम इंडियातही दिसू शकतो. ध्रुव जुरेलने आतापर्यंत उत्तर प्रदेशसाठी 11 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 587 धावा केल्या आहेत तर चार टी-20 सामन्यांमध्ये 60 धावा केल्या आहेत.
IPL 2023 : नवख्या खेळाडूचा सिक्सर…,रागाच्या भरात बॉलरने डोक्यावरच मारला बॉल